Yavatmal Crime News : यवतमाळच्या (Yavatmal News) ढाणकी परिसरात गुप्त धन शोधणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने बिटरगाव पोलीस त्या गुप्तधन शोधणाऱ्या टोळीच्या शोधात होते. दरम्यान, काही संशयित व्यक्ती गुप्तधन शोधत असल्याची गोपनीय माहिती बिटरगाव पोलिसांना (Yavatmal Police) मिळाली. या माहितीच्या आधारे गणेश मामीलवाड यांचे शेतात धाड टाकून त्यात पाच संशयितांना (Yavatmal Crime) अटक करण्यात आली आहे. त्यांचाकडून पाच मोबाईल, तीन मोटरसायकल, डीप सर्च मेटल डिटेक्टर, एक चाकू असा एकूण 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
पाच जणांसह लाखोंचा मुद्देमाल केला जप्त
गुप्त धन मिळवून देण्याच्या नावाने अघोरी विद्या आणि अंधश्रद्धा पसरवून लोकांची लूट करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेत त्या दिशेने तपास सुरू केला होता. दरम्यान एका गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार काही संशयित लोक गणेश मामीलवाड यांच्या शेतात तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकत पाच संशयितांना अटक केली आहे. जीवन गोविंद जाधव (रा. टेंभुरदरा), संतोष हरीसिंग राठोड (रा. बाळदी),अभिजीत गणेश मामीडवार (रा. ढाणकी), सर्वजीत कांनबा गंगरपाड ( रा. ढाणकी) आणि पंडित विश्वनाथ राठोड (रा. चिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महाराष्ट्री नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी गेलेल्या नऊ दुचाकी जप्त
यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस आणि शहर पोलिसांनी नऊ मोटर सायकल जप्त करून दोघांना अटक केली आहे. विठ्ठल उमेश कणसे आणि अमोल शाम देहाने असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक नरेश रणधीर तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या पथकाने ही कारवाई केलीय. दरम्यान, त्यांच्या कडून आणखी काही वाहन चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यताही पोलीस विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या