Yavatmal Crime News : इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या (Crime News) केल्याची घटना उजेडात आली होती. ही खळबळजनक घटना  यवतमाळच्या (Yavatmal News) पिरंजी या गावी 16 जून रोजी उघडकीस आली होती. देवराव ऊर्फ रूद्र विठ्ठल भुसाळे (वय 10 वर्ष) असे मृतक मुलाचे नाव आहे. या प्रकरणी  मृत मुलाची आई दुर्गा विठ्ठल भुसाळे यांना साक्षीसाठी बोलावले असता त्यांनी नमूद केलेल्या रिपोर्टमध्ये माझ्या मुलाचा गळा आवळून हत्या करून शव गोठ्यात लटकवून ठेवल्याचे म्हटले आहे.


आईच्या तक्रारीनंतर उमरखेड पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु संबंधित मारेकऱ्यांचा अजूनही पोलिसांना शोध लावता आला नसून स्थानिक गुन्हे शाखेसह चार पथके आरोपीच्या मागावर आहे. मृतक देवराव भुसाळे त्याचा मृतदेह घरासमोरच्या गोठ्यात फाशी घेतलेल्या अवस्थेत संशयास्पदरित्या आढळून आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. 


आईनेच हत्या केलाचा संशय?


यवतमाळच्या पिरंजी या गावी 16 जून रोजी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. यात  देवराव ऊर्फ रूद्र विठ्ठल भुसाळे या  10 वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. यानंतर आपल्या मुलांचा मृत्यू हा आत्महत्या नसून कुणीतरी त्यांची हत्या केली, असे मृतकाची आई दुर्गा विठ्ठल भुसाळे यांचे म्हणणे आहे. त्यांनी या बाबत पोलिसांकडे रितसर तक्रार करत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची त्या दिशेने तपास करत असून अद्याप पोलिसांना कुठलाही सढळ पुरावा हाती लागलेला नाही. परिणामी, पोलिसांनी  स्थानिक गुन्हे शाखेसह चार पथके नेमून आरोपीचा शोध घेण्यास रवाना केली आहे. तर दुसरीकडे आईनेच ही हत्या केली असावी, अशीही चर्चा सध्या परिसरात होत आहे. मात्र तपासाअंती यातील सत्य बाहेर येणार असून सध्या पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.


चाकूने वार करत एकाची निर्घृण हत्या


अज्ञात आरोपींनी मध्यरात्री एका 17 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली आहे. उज्वल मेश्राम (वय 17 वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा गोंदिया शहरातीलच रहिवासी असून काल, 18 जून रोजी रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. यात उज्वल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली असून गोंदिया शहर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून दोन चाकू मिळाले आहेत. तर या हत्येच्या घटनेने परिसरात एकच दहशत पसरली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या