Marathi Celebrities on Vasai Crime : मुंबईजवळ असलेलं वसई (Vasai Crime) शहर मंगळवारी एका धक्कादायक घटनेनं हादरलं. वसईच्या गौराईपाडा परिसरात एका प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या मुलीचा मृत्यू झाला. एका मोठ्या लोखंडी पान्याने तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. रोहित यादव या 29 वर्षीय तरुणाने आरती यादव या 22 वर्षीय तरुणाची जीव घेतला. पण यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा राज्यभरातून निषेध केला. यावर दिग्दर्शक समीर विद्वंस (Sameer Vidwans) याने संतप्त आणि तितकच विचार करायला लावणारी एक पोस्ट केली आहे. 


वसईतील घटनेवर अनेक कलाकार मंडळी देखील व्यक्त झाली आहेत. किरण माने यांनी देखील पोस्ट करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. किरण माने यांनी तर पोस्ट करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. समीरने देखील त्याच्या पोस्टमधून विचार करायला लावणारे अनेक प्रश्न मांडले आहेत. 


समीरची पोस्ट काय?


समीर विद्वंसने शालेय शिक्षणात मानसशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा मुद्दा मांडला आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, वसईत एका मुलीचा तिच्या ‘तथाकथित’ प्रियकराने दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष निर्घृण खून केला. हे असं वारंवार होत असतं. भयानक आहे हे. पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का?! मुर्दाड बघ्यांचं काय करायचं हे प्रश्नं आहेतच. पण आता असं वाटत नाही का की शाळांमधून (मराठी,इंग्रजी,महानगरपालिका, खाजगी, किंवा इतर.. ) सर्व ठिकाणी मानसशास्त्र हा विषय असायला हवा?! मानसोपचार तज्ज्ञ/समुपदेशक बोलावून लहानपणापासून गोष्टी शिकवायला हव्यात?! पालकांचेही वेळोवेळी सेशन्स व्हायला हवेत?!
मला तरी असं वाटतं, की ह्याचा गांभिर्याने विचार करायला हवा! प्रयत्न तरी नक्कीच व्हायला हवेत.






किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?


किरणम माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, वसईमधला तरूणीच्या हत्येचा व्हिडीओ पाहुन काळीज पिळवटलं. या तरूणीने याआधी या तरूणाबद्दल पोलीसांत तक्रार दिलेली होती ! गृहमंत्री महोदय, आतातरी राजीनामा द्या. 




ही बातमी वाचा : 


Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Movie : "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष, तरिही निर्मात्यांची मोठी घोषणा