Yavatmal Bus Accident : नांदेडहून नागपूरला (Nagpur) जाणाऱ्या एका एसटी बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. यवतमाळच्या उमरखेड घाटामध्ये हा अपघात झाला असून या अपघातात 40 ते 45 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. एसटी महामंडळाची बस (बस क्रमांक एमएच 20 बी एल 2607) नांदेडवरून (Nanded) नागपुरसाठी निघाली होती. दरम्यान, यवतमाळच्या (Yavatmal) उमरखेड घाटामध्ये बांधकामसाठी वापरण्यात येणाऱ्या सीमेंट मसाला भरलेला गाडीने मागून येत पुलावर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हाडरला धडकुन पुढे अडकली. या बसमध्ये जवळपास 40 ते 45 प्रवाशी प्रवास करीत होते. मात्र, सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सध्या सर्व प्रवाश्यांना बाहेर काडून जेसीबीच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात येत आहे. 


थोडक्यात बचावले प्रवासी 40-45 प्रवासी


एसटी महामंडळची बस आज 4 एप्रिलच्या सकाळच्या सुमारास नांदेडवरुन नागपूरला जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान, ही बस दुपारी यवतमाळच्या उमरखेड घाटामध्ये आली असता, मागून येणाऱ्या एका सिमेंटच्या गाडीने एसटी बसला धडक दिली. या जोरदार धडकेनंतर बस अक्षरक्ष: रस्त्याच्या बाजूला जाऊन आदळली. सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हाडरमुळे ही बस पूलावरून खाली कोसळण्यापासून बाचावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


या बसमध्ये 40-45 प्रवासी होते. अपघत झाल्यानंतर बस मधील सर्व प्रवासी त्यात अडकून होते. त्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखात बसमधील सर्व प्रवाश्यांना बसच्या बाहेर काढले. यामुळे मोठा अपघात टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थाळ गाठून पुढील कारवाई सुरू केली आहे.  


एसटी आणि खासगी बसचा भीषण अपघात, एक महिला जागीच ठार


असाच एक अपघात आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बस यांच्यात झालाय. या बस मध्ये एकूण 44 प्रवासी होते. तर त्यातील 25 प्रवासी या अपघातात जखमी झाले असून एका महिलेचा यात जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच यात सहा प्रवाश्यांची प्रकृती गंभीर असून सध्या जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, ओवरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असून खाजगी बसने एसटी बसला मागून धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या