मुंबई : दहिसरमध्ये अंगावर काटा आणणारी एक संतापजनक घटना घडलीय. आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या 6 वर्षाच्या मुलीच्यासमोर तिच्या वडिलांच्या शरीराचे तुकडे केले आणि घराच्या किचनमध्ये खड्डा करुन पुरले. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नीने आपल्या पतीचा खून केला आणि तो गायब आहे अशी तक्रारही दिली.
पश्चिम उपनगरातील दहिसर पूर्वच्या खान कंपाऊंड येथून एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा खुलासा एका सहा वर्षाच्या चिमुकलीनं केला आहे. तिच्या आईनं मुलीसमोरच आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली.
घटनेच्या 11 दिवसानंतर मुलीनं दिलेल्या माहितीवरुन दहिसर पोलिसांनी तिच्या वडिलांचा मृतदेह घराच्या स्वयंपाकघरातून खोदून बाहेर काढला. नवऱ्याच्या हत्येप्रकरणी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
काय आहे घटना?
उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचं 2012 मध्ये शाहिदा नावाच्या तरुणीसोबत लग्न झालं. लग्नानंतर हे दोघंही दहिसर पूर्वच्या खान कंपाऊंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. रईस दहिसर पूर्व, रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. तर, त्याची पत्नी सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत घरीच असायची. याच काळात शेजारी राहाणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत तिचे विवाहबाह्य संबंध सुरु झाले. ही गोष्ट रईसला समजली तेव्हा त्यानं या गोष्टीला विरोध केला. पतीचा रोजचा विरोध शाहिदाला नकोसा झाला होता, त्यामुळे तिनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. शेवटी आपल्याच 6 वर्षांच्या चिमकुलीसमोरच तिच्या वडिलांच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि घरात 4 फूट खड्डा करून गाडले.
महत्वाच्या बातम्या :
- औरंगाबादमधील सदोष व्हेंटिलेटरबाबत कोणालाही दोषी ठरवत नाही, प्रकरण सामंजस्याने सोडवावं : केंद्र सरकार
- Google Doodle : समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या Frank Kameny यांना गुगलची डूडलच्या माध्यमातून मानवंदना
- भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणा; अमूलचं पंतप्रधान मोदींना आवाहन