ठाणे : अनेकदा आपला भूतकाळ वर्तमानात डोकावतो असं आपण ऐकतो. पण खरचं असं झालं तर कोणत्या परिणामांचा सामना करावा लागेल याची कल्पनाही करवत नाही. अशीच एक घटना ठाणे शहरात घडली आहे. एका तरुणीच्या भूतकाळातील व्हिडीओमुळे तिच्या वर्तमानात तिला अगदी सळो की पळो करून सोडलं आहे.
आपल्या प्रियकरासोबत भूतकाळात व्यतीत केलेल्या प्रेमसंबधाच्या चित्रणामुळे एक तरुणी चांगलीच अडचणीत सापडली आहे. नोकरीच्या ठिकाणी ओळखीतून तरुणाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. मात्र, त्यांच्यातील प्रेमसंबधाचा पुरावा असलेला पेनड्राईव्ह एका तिसऱ्याच व्यक्तीच्या हातात पडला आहे. आणि त्या भामटयाने याच संधीचा फायदा घेत तरुणीकडे 1 लाख रूपयांची खंडणी मागितली आहे. एवढचं नाहीतर जर एक लाख रूपयांची खंडणी दिली नाही, तर मात्र पेनड्राइव्ह मधील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी प्रियकर, तरुणीसह तिच्या भावालाही दिली आहे. हा खळबळजनक प्रकार ठाण्यात घडला असून सदर प्रकरणी 29 वर्षीय पीडित तरुणीने वर्तकनगर पोलीस स्थानकार अज्ञात ब्लॅकमेलर विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पाहा व्हिडीओ : गर्दी नियंत्रणात आणता येत नसेल तर तात्काळ दारुबंदी करा - प्रवीण दरेकर
ठाण्यातील पोखरण रोड नं 2 परिसरात वास्तव्य करणारी पिडीत तरुणी 20018-19 या काळात कासारवडवली येथे नोकरीला होती. तेथील एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. कालांतराने भांडणे होऊन दोघेही विभक्त झाले. तिनेही कासारवडवली येथील नोकरी सोडून वर्तकनगर परिसरात नोकरी सुरु केली. अचानक एक दिवस तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला.
अज्ञात व्यक्ती फोनवर बोलताना म्हणाला की, 'मी तुला किती शोधलं, आत्ता सापडलीस.' असं म्हणत, 'तुझ्या प्रेमसंबंधाचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तेव्हा,1 लाख रुपये दे नाहीतर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होईल.' अशी धमकी दिली. हादरलेल्या तरुणीने प्रियकराला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्याने आपल्या दोघांचे चित्रण असलेला पेनड्राइव्ह हरविल्याचे सांगितले. हा पेनड्राइव्ह त्रयस्थ व्यक्तीला सापडला असून त्यासाठी तो 1 लाखांची मागणी करत असल्याचे त्याने सांगितले. धमकावणाऱ्या भामट्याने काही फोटो तरुणीच्या भावाला आणि तिच्या गावाकडील काही जणांना व्हाट्सअपवर पाठविले असल्याचे पिडीत तरुणीने तक्रारीत नमूद केलं आहे. त्यानुसार, वर्तकनगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
लग्नाला अडचण येऊ नये म्हणून गर्भातील बाळाची फेसबुकवर विक्रीचा प्रयत्न
बाप लेकीच्या नात्याला काळीमा! जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या दोन मुलीवर अत्याचार