बीड : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पेशाने मुख्याध्यापक असलेल्या बापाने आपल्या पोटच्या दोन मुलीवर बलात्कार केला. तर, तिसऱ्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार तिघींनी आईला सांगूनही सर्व नातेवाईकांनी तुम्ही गप्प बसा; नाहीतर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी देत मारहाण केली. यातील एका मुलीनी ही घटना आपल्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीच्या मावशीच्या मदतीने त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या.
ही घटना एका मुलीने तिच्या मैत्रिणीच्या मावशीला सांगून मावशीने एका सामाजिक कार्यकर्त्याद्वारे ही माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर केज पोलिसांनी त्या पीडित मुलींशी भेटून त्यांची कैफियत ऐकली आणि गुन्हा दाखल करताच त्या नराधम बापाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नराधम बापासह आई, भाऊ, चूलते, चुलतभाऊ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केज तालुक्यात मानवतेला आणि बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली असून आठ वर्षापूर्वी एक नराधम बापाने त्याच्या पोटच्या मुली सोबत बळजबरीने बलात्कार केला. तसेच दुसऱ्या मुली सोबतही अशाच प्रकारे बलात्कार केला. तसेच काही दिवसानंतर आई गावाला गेल्यानंतर तिसऱ्या मुलीसोबतही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता.
भरदिवसा घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न
नराधाम बापाविरोधात गुन्हा दाखल
हा सर्व प्रकार त्या तिघी बहिणी जिवाच्या भीतीने सहन करीत होत्या. मात्र, हा सर्व अन्याय सहन न झाल्याने एका मुलीने तिच्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिच्या मावशीमार्फत एका सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पीडित मुलींची सुटका केली आणि त्यांच्या फिर्यादीवरून नराधम बापा विरोधात बलात्कार, बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आई, भाऊ, चुलता व चुलत चुलत भाऊ यांचतावरही गुन्हा दाखल केला आहे.
Pune Lockdown | पुण्यात नियम मोडणाऱ्यांना पोलिसांची अद्दल, उगाचंच फिरणाऱ्यांच्या गाड्या जप्त