Shahjahanpur News : पत्नीने निघृणपणे पतीची हत्या केल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 300 रुपयांमुळे झालेलं हे भांडण इतकं टोकाला जाईल, असा कुणी विचारही केला नसेल. पत्नीने पतीवर वीटेने जीवघेणा हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 300 रुपयांवरून पत्नी आणि पतीमध्ये भांडण झाले. यानंतर पत्नीने घराच्या दाराजवळ असलेल्या विटेने पतीच्या डोक्यावर वार केला. रागाच्या भरात असलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यावर अनेक वेळा विटेने वार करत त्याची हत्या केली. इतकंच काय तर पतीच्या मेंदूचा चेंदामेंदा करुन तिने त्याचं मांस हाताने आजूबाजूला फेकलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पत्नीकडून पतीची विटेने ठेचून हत्या
उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूर येथील ही खळबळजनक घटना समोर आली आहे. रोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हथौडा गावात ही घटना घडली आहे. सत्यपाल याची पत्नी गायत्री हिने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास विटेने हल्ला करून त्याची हत्या केली. घराच्या दरवाजाबाहेरच तिने पतीवर जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर विटेने वार केल्यानंतर पहिल्या काही वारामुळे सत्यपालचा मृत्यू झाला, मात्र, त्यानंतरही पत्नी गायत्री त्याच्या छातीवर बसून गायत्री 10 मिनिटे त्याचं डोके फाडत राहिली आणि त्यांच्याकडे मांसाचे तुकडे फेकत राहिली.
विटेने हल्ला करत डोक्याचा चेंदामेंदा
काही उपस्थितींनी हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात चित्रित केला असून त्याचा व्हिडीओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून पत्नी गात्रीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलीस कोठडीत असताना गायत्रीने सांगितलं की, तिचा नवरा खूप क्रूर होता. तो तिला घरात कोंडून ठेवायचा आणि खूप मारहाण करायचा. गायत्रीला शुक्रवारी तुरुंगात पाठवण्यात आलं. दरम्यान, पोलीस सध्या याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक VIDEO व्हायरल
नेमकं काय घडलं?
शाहजहांपूरच्या रोजा पोलीस स्टेशन परिसरात पतीची हत्या करणाऱ्या गायत्री या कृत्यामुळे तिच्या पालकांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांच्या चौकशीत गायत्रीने सांगितले की, तिचा नवरा तिला वारंवार मारहाण करायची, मी फक्त एकदाच त्याला मारहाण केली आहे. दरम्यान, आरोपी पत्नी मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. गायत्रीने सांगितलं की, गुरुवारी सत्यपाल तिच्याकडून 300 रुपये मागत होता. पैसे न दिल्याने त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तिने शेजारीच असलेली वीटही उचलून त्याचं डोकं फोडलं. यानंतर तिचा राग शांत झाला नाही आणि तिने त्याच्या डोक्यावर वीटेने वार केले. गायत्रीने सांगितलं की, यावेळी रागामुळे तिचे भान हरपलं आणि ती काय करत आहे, हे तिला समजलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :