एक्स्प्लोर

Umesh Kolhe Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आज अमरावतीत काय-काय घडलं?

Umesh Kolhe Case :  अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आज अमरावतीत भाजपसह विविध संघटनेने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले होते.

Umesh Kolhe Case :  अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आज अमरावतीत भाजपसह विविध संघटनेने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे शहरात उदयपूर सारखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सकाळीच शहरातून मोठा रूटमार्च काढला आणि शहरात विविध चौकात बंदोबस्त लावला होता. यावेळी पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली होती. दरम्यान, आज याप्रकरणी अमरावतीत आज काय-काय घडलं, हे जाणून घेणार आहोत. 

अमरावती येथील उमेश कोल्हे यांची सुनियोजित हत्या करण्यात आली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आज सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने अमरावती करांकडून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी भाजप, विहिप, बजरंग दल व्यापारी आणि अमरावतीकर सोबतच अनेक संघटनेचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी कोल्हे कुटुंबातील सदस्य प्रामुख्याने हजर होते. 

यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी या कार्यक्रमावर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली होती. विशेष म्हणजे यावेळी श्रद्धांजली होण्यापूर्वीच पोलिसांनी भाजपच्या पाच जणांना डिटेन केल्याने भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी पोलीस आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली तेव्हा सगळ्यांना सोडण्यात आले.

यावेळी खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले की, उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावती शहरातील जनता भयभीत आहे. अमरावती भयमुक्त व्हावी, अवैध धंद्यावर अंकुश राहावा, महिलांना भयमुक्त जगता यावं. 21 जूनला हत्या झाली मात्र आरोपींनी उद्देश सांगितला नाही. 10 दिवस हे प्रकरण पोलिसांकडून दडपण्यात आलं, कोल्हे कुटुंबावर दबाव आणण्यात आला असं ते म्हणाले आहेत.

उमेश कोल्हे हत्येचा तपास हे NIA कडे द्यावा ही सर्वात आधी मागणी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती. त्यांना सुरुवातीपासून ह्या हत्येत नुपूर शर्मा यांची काही पोस्ट व्हायरल करल्यानेच झाली, असा अंदाज त्यांना होता आणि अखेर तेच झालं. 

 तर दुसरीकडे पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी सांगितले की, अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आम्ही सुरुवातीपासून या केसचा बारकाईने तपास करत होतो. अमरावती शहराची परिस्थिती पाहून आणि संपूर्ण सगळे पुरावे हाती आल्यावर आम्ही माहिती दिली. खासदार नवनीत राणा यांनी लावलेले आरोप हे खोटे आहे. आम्ही सर्व पुरावे मिळाल्या शिवाय माहिती दिली नाही. शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे..

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी अटकेत असलेले सात आरोपींपैकी चार आरोपींना आज न्यायालयात हजर केले. या चार आरोपींची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना हजर केले. पण यावेळी NIA चे अधिकारी ही न्यायालयात आहे. आता सगळ्या आरोपींना न्यायालयात आणण्याचे आदेश दिल्याने NIA हे आजच आरोपींचा ताबा घेईल. मुंबईत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
राहुल गांधींसमोर आदिवासी उपोषणाचा मुद्दा, आता आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळ संतापले
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
Rupali Patil Thombare: रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
Embed widget