एक्स्प्लोर

Muskan death Case : 'आधी मारणार, मग...', मुस्कानला संपवण्यापूर्वी इम्रानने केललं इन्स्टावर लाईव्ह; काय म्हणाले दिल्ली पोलीस?

Muskan death Case : मुस्कानच्या हत्येचा तपास जसा पुढे सरकत आहे, तशा आरोपी आणि पीडितेच्या नात्यातील अनेक बाबी समोर येत आहेत.

Muskan death Case : दिल्लीच्या टिळक नगर भागात २१ वर्षांची कंटेंट क्रिएटर मुस्कान शर्माच्या हत्येने आधीच खळबळ उडवून दिली होती. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक (Muskan death Case) दावा समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुस्कानच्या हत्येच्या सुमारे एक तास आधी आरोपी इम्रान कथितरीत्या इन्स्टाग्राम लाईव्हवर आला होता. या व्हिडिओमध्ये त्याने स्वतः आत्महत्या करण्याची भाषा केली आणि नंतर मुस्कानची हत्या (Muskan death Case) करण्याची धमकी दिली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, पोलीस सध्या या कथित लाईव्ह व्हिडिओची सत्यता पडताळून पाहत आहेत. म्हणजेच व्हिडिओ समोर नक्कीच आला आहे, पण तपास पूर्ण होईपर्यंत त्याला भक्कम पुरावा मानले जात नाहीये. दरम्यान, इम्रानला अटक करण्यात आली. राजौरी गार्डनमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याच्या पायात तीन गोळ्या लागल्या.(Muskan death Case)

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, मुस्कानच्या हत्येचा तपास जसा पुढे सरकत आहे, तशा आरोपी आणि पीडितेच्या नात्यातील अनेक बाबी समोर येत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, इम्रान आणि मुस्कान २०२४ पासून एकमेकांना ओळखत होते. 'सेव्हन झोन' जिममध्ये त्यांची भेट झाली होती, जिथे इम्रान ट्रेनर म्हणून काम करत होता. गेल्या सुमारे दोन महिन्यांत त्यांच्या नात्यात कटुता वाढली होती. इम्रान व्यसनाच्या आहारी गेला होता आणि त्याच्या वर्तनातही बदल झाला होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. मुस्कानने १८ जुलै रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता, परंतु औपचारिक तक्रार दाखल केली नव्हती. आता हत्येपूर्वी कथित इन्स्टाग्राम लाईव्हची बाब समोर आल्यानंतर तपासाचा केंद्रबिंदू आरोपीची मानसिक स्थिती, सोशल मीडियावरील पोस्ट आणि हत्येपूर्वीच्या त्याच्या सर्व गोष्टींवर आहे.

Muskan death Case : मुस्कानच्या हत्येपूर्वी इन्स्टाग्राम लाईव्हचा दावा

पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, इम्रान कथितरीत्या मुस्कानच्या घरी पोहोचण्याच्या सुमारे एक तास आधी इन्स्टाग्रामवर लाईव्ह आला होता. यादरम्यान त्याने आधी स्वतःचा जीव घेण्याचे आणि त्यानंतर मुस्कानला मारण्याचे विधान केले. तो व्हिडिओ खरोखरच त्याचा आहे की नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत. तपास यंत्रणा त्याच्या सोशल मीडियावरील हालचाली आणि डिजिटल रेकॉर्डचीही तपासणी करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, २६ ऑगस्टच्या संध्याकाळी सुमारे ५:४० वाजता इम्रान ओल्ड महावीर नगर येथील मुस्कानच्या घरी पोहोचला होता. त्या वेळी मुस्कान घरात एकटीच होती. घरात जबरदस्तीने घुसल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. दोघांमध्ये वाद झाला आणि पोलिसांच्या दाव्यानुसार, इम्रानने आधी तिचा गळा आवळला आणि नंतर चाकूने पोटावर अनेक वार केले. यानंतर तो मुस्कानचा फोन घेऊन पसार झाला. संध्याकाळी सुमारे ६:४० वाजता घरकाम करणाऱ्या महिलेने मुस्कानला जखमी अवस्थेत पाहिले. या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी टिळक नगर पोलीस ठाण्यात BNS च्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुस्कानच्या हत्येनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इम्रानचा शोध सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री ११:१५ च्या सुमारास तो नाला रोड येथील सब-रजिस्ट्रार ऑफिसजवळ चालत फिरताना आढळला. पोलीस पथकाने आपली ओळख पटवून त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रानने अचानक पिस्तूल काढून पोलिसांवर सुमारे चार राऊंड फायर केले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी तीन गोळ्या झाडल्या, ज्यातील दोन त्याच्या उजव्या पायात आणि एक डाव्या पायात लागली. त्याला अटक करून रघुबीर नगर येथील गुरु गोविंद सिंग रुग्णालयात नेण्यात आले. या गोळीबारात कोणताही पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. या प्रकरणी राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात BNS आणि आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमांतर्गत वेगळी एफआयआर (FIR) देखील दाखल करण्यात आली आहे.

Muskan death Case : इम्रानवर आधीपासूनच गंभीर गुन्हे दाखल

पोलीस तपासात इम्रानच्या जुन्या गुन्हेगारी रेकॉर्डचाही उल्लेख समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये टिळक नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एका अल्पवयीन मुलीशी संबंधित पोक्सो (POCSO) प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये दुखापत पोहोचवणे, चुकीच्या पद्धतीने रोखणे, महिलांशी अश्लील वर्तन आणि पाठलाग करणे यांसारख्या आरोपांशी संबंधित कलमेही लावली गेली होती. याशिवाय, २०२१ मध्ये एका महिलेला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Bhiwandi Shawarma Poisoning Marathi News: भिवंडीत शोरमा विषबाधेचा कहर! रुग्णांचा आकडा 116 वर; 4 जणांना ठाण्यात हलवले; महापालिकेचा शहरभर बुलडोझर 
भिवंडीत शोरमा विषबाधेचा कहर! रुग्णांचा आकडा 116 वर; 4 जणांना ठाण्यात हलवले; महापालिकेचा शहरभर बुलडोझर 
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
Embed widget