Washim News वाशिम : संशयाचे भूत माणसाच्या डोक्यात घुसले कि सुखी संसाराची कशी राख-रांगोळी होते याचे अनेक उदाहरण आपण अनेक घटनातून बघत अथवा वाचत असतो. अशाच एका घटनेचा प्रत्यय आलाय तो वाशिम (Washim Crime News) जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक या गावात. येथील गाव शिवारातील मोरदडा  भागात  एका  35 वर्षीय महिलेचे प्रेत सापडल्याची घटना  काल  संध्याकाळच्या सुमारास  उजेडात आली होती. मात्र, हि महिला दुसरी तिसरी कुणी नसून गावातील उषा विलास सुर्वे नामक  महिला असल्याच तपासात उघड झाले. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.


पत्नीच्या हत्येनंतर पतीने स्वत:लाही संपवलं!


यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असता ही हत्या कुणी केली असावी? याचा रिसोड पोलीस तपास करत होते. दरम्यान आज सकाळी बुलढाणाच्या लोणार पोलीस स्टेशन हद्दीतील मोहदरी शिवारात मृत महिलेच्या पती  विलास लिंबाजी सुर्वे (वय वर्ष  40) याचा एका झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे पत्नीची हत्येनंतर पतीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून चारीत्र्यावर सततच्या संशयाने पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद व्हायचे. अशातच संशयाच भूत मानगुटीवर बसलं आणि पत्नीला फोटो काढण्याच्या बहाण्याने जंगलामध्ये नेऊन तीची दगडाने ठेचुन क्रूरतेने हत्या केल्याचे तपासत उघड झाले आहे.  


आई वडीलांच्या हत्येच्या घटनेने दोन चिमुकल्यावरचे हरवले छत्र


आपल्या हातून अपराधी कृत्य घडल्याचा कदाचित पश्चाताप पती विलास सुर्वेला झाला असावा आणि विलासने हि झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा रिसोड पोलीस आणि लोणार पोलीस करत असून घटनेची तक्रार मृतक महीलेचा भाऊ अनिल चिमणाजी भोटाणे (रा.केसापुर,जिल्हा हिंगोली) यांनी दिलेली आहे. दरम्यान या मृत दाम्पत्याला एक 15 वर्षाचा मुलगा असून एक 14 वर्षाची मुलगी आहे. केवळ संशयाच्या भरातून घडलेल्या या हत्येच्या घटनेने दोन्ही चिमुकल्याचे आई वडिलांचे   छत्र हरवल्याने लोणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या