Washim News : वाशिमच्या बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडेच्या अपहरणाच्या  (Kidnap) प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अखेर अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेतचा मृतदेह सापडला आहे. वाशिम – पुसद मार्गावर अनिकेत मृतदेह सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन अनिकेत साधुडे याचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं. 12 मार्चला हे अपहरणाचे प्रकरण घडले होते. त्यानंतर पोलिसांना (Police) अनिकेतच्या शोधासाठी तपासाची चक्रे गतिमान करत शोध सुरू केला. मात्र तरीही अनिकेतचा थांगपत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली आहे. तर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तब्बल चार जिल्ह्यातील 12 पोलिस पथकं शोधकार्यात लावली होती. अखेर 9व्या दिवशी अनिकेतचा मृतदेह सापडल्याने साधुडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


शेतकरी कुटुंबावर शोककळा, वाशिम हादरलं 


पुढे आलेल्या माहितीनुसार, वाशिमच्या बाभूळगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील 14 वर्षीय अल्पवयीन अनिकेत साधुडे याचे  12 मार्चला अपहरण झाले होते. त्यानंतर त्याचा तपास केला असता तो कुठेही आढळून आला नाही. विशेष म्हणजे अपहरणाच्या घटनेला 9 दिवस उलटूनही पोराचा थांगपत्ता न लागल्याने वडिलांचे डोळे सतत पाणावले होते, तर आईचे डोळे लेकराच्या वाटेकडून नजर लावून बसले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली होती आणि पोलिसांनी अनिकेतचा शोध घेत असताना चार जिल्ह्यातील 12 पोलिस पथकं शोधकार्यात लावली होती.


60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण अन् हत्या?


या तपासात अनिकेत साधुडे याचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं आहे. अपहरण होऊन बराच कालावधी उलटून सुद्धा पोलिसांना (Police) थांगपत्ता न लागल्याने अनिकेतच्या पालकांना मोठी चिंता लागली होती. आखेर आज (21 मार्च) म्हणजेच घटनेच्या 9व्या दिवशी अनिकेतचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून यातील आरोपींचाही शोध घेतला जात आहे.


अकोल्यातल्या अकोट फैल भागात अग्नितांडव


अकोल्यातल्या अकोट फैल भागात आज दुपारच्या सुमारास अग्नितांडव पाहायला मिळालाये. अकोट फैल भागातल्या भारत नगरात 3 टीनाच्या घराला आग लागलीय. भारत नगरात असलेल्या एका टीनाच्या घरातील सिलेंडर लिकेज झाल्यामुळे ही आग लागली असल्याच समजते आहे. बघता बघता आगीने तीनही घर आपल्या आटोक्यात घेतली. अतिशय भीषण ही आग होती. आगीत तिनही घरातील सर्व घरघुतीसामान जवळू खाक झाल आहे. सुदैवाने आगीत कुठलेही जीवितहानी झाली नाही.


दरम्यान, अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने पूर्णत: तिनही घरांना विळख्यात घेतलं होतंय. या आगीत जवळपास लाखो रुपयांच नुकसान झाल आहे. आगीमूळ भारत नगरातील तिनही कुटुंब आज उघड्यावर आलेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आली आहे. सिलेंडर लिकेज झाल्यामुळे ही आग लागली होती, असं अनुमान लावल्या जातेय.. मोलमजुरी करणाऱ्या तिनही कुटुंबियांचं आगीमूळ अतोनात नुकसान झालंय.   


इतर महत्वाच्या बातम्या