Harshvardhan Sapkal : महाराष्ट्रातली आजची सर्वात मोठी समस्या जर कुठली असेल तर तो माणसा- माणसात, समाजात, माणसांच्या मनामनात, जाती धर्मात जो द्वेष आणि अंतर पडत चाललं आहे ती मोठी समस्या आहे. त्यामुळे सद्भावना लयास गेली आहे की, तळाशी गेली आहे हे तपासावं लागत आहे. दुसरीकडे माणसं कुठल्याही दुकानात गेली असताना किंवा कुठला व्यवहार करत असताना आपल्या जातीच्या व्यक्ती बघू लागली आहे. तसेच कुठल्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलत असताना ती आपल्याच जातीचा व्यक्ती बोलवत असल्याचे चित्र उभं राहतंय. यावर बोलण्याचं तत्वपर्य काय तर जो, शिव फुले शाहू आंबेडकरांचा वारकऱ्यांचा संत गाडगेबाबांच्या विचारांचा आणि महाराष्ट्र धर्म जो आपण मानतो त्याची घडी कुठेतरी विस्कळीत झाली असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे आजची समाजाची विस्कटलेली ही घडी व्यवस्थित करत असताना कुठल्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे तर त्याचं उत्तर हे सद्भावना हे आहे. असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुलाखत देत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
सध्या जी काही विधान केली जातं आहेत सद्भावना विरहित आहे. त्यामुळे आम्ही काढलेली सद्भावना यात्रा ही केवळ बीडसाठी नसून ती सबंध महाराष्ट्रासाठी होती. असेही हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले. त्यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमातमुलाखत देत असताना राज्याच्या एकंदरीत परिस्थितीवर आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.
मुख्यमंत्र्यांवरील टीका कारभाराच्या अनुषंगाने होती- हर्षवर्धन सपकाळ
येणाऱ्या काळात सद्भावना बाळगूनच समाजासाठी काम करण्याची माझी पक्षीय आणि व्यक्तिगत मनीषा असल्याचे ही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. औरंगजेबाचा दाखला देत मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नसून ते वक्तव्य कारभाराच्या अनुषंगाने होतं. ज्या घटना सध्या राज्यात घडत आहेत त्या अतिशय क्रूरपणे एकापाठोपाठ एक उजेडात येत आहे. हा घटनाक्रम लक्षात घेता मी ते वक्तव्य केल्याची स्पष्टोक्ती ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलताना दिली आहे.
राज्यपालांनी पुरस्कार दिलेल्या तरुण शेतकऱ्यावर 8 पाणी पत्र लिहून आत्महत्येची वेळ
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मी जाऊन आलो आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्याचे वर्णनही आपण करू शकत नाही. तिथे पोलीस ही नाही, हम करे सो कायदा असं म्हणत निवडक टोळीच्या हातात कायदा आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्काराची घटना असेल. जळगाव मध्ये एका केंद्रीय मंत्र्याला पोलीस स्टेशनमध्ये धरणे आंदोलन देऊन आरोपींना अटक करा अशी मागणी करावी लागत आहे. असाच बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नांगरे नावाचा शेतकरी तरुण आहे. शेतीतील अभिनव प्रयोग या विषयात त्याला स्वतः राज्यपालांनी पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्यांच्या अंतविधीला मी होतो. माझ्या मुलाला तू शिकव असं काही महिन्यापूर्वी मी त्याला म्हणालो होतो. त्याच तरुण शेतकऱ्याला आठ पाणी पत्र लिहून आत्महत्या करावी लागते हे उघड उघड शासनाचे अपयश आहे.
त्यात एका बाप आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणुन बघताना, असं न राहुल वाटतं की राज्याचा कारभार हा चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. प्रकार क्रूर पद्धतीने काम करत आहे असं माझं व्यक्तिगत मत असल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता जो राज्याचा कारभार सुरू आहे त्याचे निरीक्षण करून मी राज्याची तुलना त्या औरंगजेबाशी केली होती. ती कुण्या एका व्यक्तीला उद्देशून नव्हती. असेही ते म्हणाले.
भाजप आणि महायुतीला बहुमत असताना पक्ष फोडण्याचे कारण काय?
ऑपरेशन कमळ चे दोन भाग आहेत. त्यात एक म्हणजे पुढचा कोण जाणार, ब्रेकिंग न्यूज काय असणार हा एक आहे. मात्र मुळात झोपला एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत असताना यांना दुसरे पक्ष फोडावे लागतात याचं कारण काय? महायुतीतील नेत्यांना आमची भीती का आहे? दुसरं म्हणजे निवडणूक झाल्या झाल्या भाजप कामाला लागलं आणि त्यांच्या मेंबर्स ची संख्या एक कोटींच्या घरात गेली. एक करोड लोक सोबत असताना तुम्ही लोकांचे पक्ष का पडतात त्याचे कारण म्हणजे त्यांच्या विश्वास नाही. एक दिवस लोक आपल्याला सत्तेतून बाहेर काढून फेकतील अशी भीती त्यांना आहे. त्यामुळे ते रेडिमेट नेते आपल्यासोबत घेतात अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि महायुतींच्या नेत्यांवर केली.