SBI Recruitment : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) हजारो पदासांठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


स्टेट बँक ऑफ इंडियाने  कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदासाठी एकूण 13 हजार 735 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 17 डिसेंबर 2024 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन फॉर्म भरु शकतात.


रिक्त पदांबाबात माहिती


एकूण पदे: 13735 पदे
सर्वसाधारण: 5870 पदे
EWS: 1361 पदे
OBC: 3001 पदे
अनुसूचित जाती (SC): 2118 पदे
अनुसूचित जमाती (ST): 1385 पदे


काय हवी शैक्षणिक पात्रता?


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.


वय मर्यादा


यासोबतच उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. 1 एप्रिल 2024 पासून वयाची गणना केली जाईल.


अर्ज दाखल करण्यासाठी उरले फक्त 4 दिवस 


स्टेट बँक ऑफ इंडियाने तरुणांना मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. मोठ्या प्रमाणात जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळं पातच्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहे. अर्ज करण्याचटी शेवटची तारीख ही 7 जानेवारी 2025 आहे. त्या तारखेच्या आत अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. त्यामुळं उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  


दरवर्षी बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते. यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. सध्या बँक ऑफ बडोदामध्ये विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची त्यांना मोठी संधी आहे. दरम्यान, जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचट बँकेत नोकरीसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळं तरुणांना याचा मोठा फायदा होमार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


बँकेत नोकरीची मोठी संधी! विविध विभागात भरती प्रक्रिया सुरु, कसा कराल अर्ज?