पुणे: पुण्यातील हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेलजवळ नोव्हेंबर महिन्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्याचा राग आल्यामुळे 6 जणांनी सुरक्षारक्षकासह त्याच्या पत्नीला दगडाने आणि हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेत सुरक्षारक्षकाची पत्नी गंभीर जखमी झाली होती. खासगी रुग्ण्यालयात तिच्यावरती उपचार सुरु असतानाच महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शीतल अक्षय चव्हाण (वय 30, रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. यात पोलिसांनी सतीश बारीकराव लोखंडे (वय 31, ) अजय दशरथ मुंढे (वय 26), भानुदास दत्तात्रय शेलार (वय 32) या तिघांना अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांचे इतर तीन साथीदार हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. त्यांचा पोलीस तपास करत आहेत. (Pune Crime News)
नेमकं काय घडलं?
हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेलजवळ उघड्यावर लघुशंका करणार्यांना हटकल्याने सुरक्षारक्षकावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यामध्ये घडली होती. या वेळी आरोपींनी केलेल्या दगडफेकीदरम्यान सुरक्षारक्षकाची पत्नी दगड लागून गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. शीतल अक्षय चव्हाण (29, रा. चव्हाण वस्ती, थेऊर) यांचा काल (बुधवारी) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. याप्रकरणी भानुदास शेलार, अजय मुंढे, सतीश ऊर्फ नाना मुंढे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे असलेले देशी बनावटीचे पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत सुरक्षारक्षक अक्षय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरामध्ये जय मल्हार हॉटेलजवळ मोकळ्या जागेत अक्षय हा सुरक्षारक्षक म्हणून काम पाहतो. अक्षय आणि त्याची पत्नी शीतल तिथे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास कारमधून आरोपी आले. ते मोकळ्या जागेत लघुशंका करत असताना चव्हाण याने त्यांना हटकले. त्यानंतर आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. चव्हाणला मारहाण करून त्याला दगड फेकून मारला. चव्हाणची पत्नी शीतलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फेकून मारलेला दगड तिला लागल्याने तिच्या डोक्याला लागल्याने गंभीर जखमी झाली. बुधवारी उपचारादरम्यान शीतलचा मृत्यू झाला. (Pune Crime News)