Virar Crime : विरारमधील (Virar) बहुचर्चित आयसीआयसीआय बँकेतील दरोडा (Virar ICICI Bank Robbery) आणि हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिल दुबे (Anil Dubey) याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनिल दुबेने वसई गुन्हे शाखेच्या कार्यालयात गळ्यावर आणि मनगटावर कागदाच्या पिनने जखम करुन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपाचरांसाठी दाखल केलं आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे.
आरोपी अनिल दुबे हा 25 नोव्हेंबर रोजी दुपारी वसई न्यायालयाच्या आवारातील सार्वजनिक शौचालयातून फरार झाला होता. विरारच्या गुन्हे शाखा 3 च्या युनिटने अखेर मुख्य आरोपी आणि त्याला साथ देणाऱ्या साथीदार चांद बादशाह खान याला अटक करण्यात यश मिळवलं होतं. ठाणे न्यायालयातून शुक्रवारी 25 नोव्हेंबरला सुनावणीसाठी अनिल दुबे या आरोपीला वसई न्यायालयात आणलं होतं. पोलीस त्याला दुपारी तीनच्या सुमारास अनिल दुबेला वसई पंचायत समितीच्या समोरील सार्वजनिक बाथरुममध्ये लघुशंकेसाठी घेऊन गेले होते. यावेळी आरोपी अनिल दुबे पोलिसांच्या हाताला झटका देऊन बाथरुमच्या बाजूच्या रोडवरील त्याचा साथीदार चांद बादशाह खान याच्या मोटारसायकलवर बसून फरार झाला होता.
लॉकअपमध्ये दुबे रक्ताच्या थारोळ्यात
या प्रकरणाचा तपास करताना विरारच्या गुन्हे शाखा 3 च्या युनिटला त्याला पकडण्यात यश आलं. मात्र वसईच्या गुन्हे शाखेत त्याला तपासासाठी काल बुधवारी (30नोव्हेंबर) आणल्यानंतर दुपारी 2.55 च्या सुमारास त्याच्यासह आरोपी चांद खान याला अनिल दुबे हा लॉकअपमध्ये ब्लँकेट ओढून झोपलेला दिसला. ब्लॅंकेट काढल्यानंतर दुबे रक्ताच्या थारोळ्यात झोपलेला दिसला. त्याने कागदाच्या पिनने गळ्यावर आणि मनगटावर जखमा केल्या होत्या. पोलिसांनी त्याला नजीकच्या आयएसिस रुग्णालयात दाखल केले होते. दुबेच्या मानेवर दोन टाके मारण्यात आले आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
अनिल दुबे वर कोणता गुन्हा दाखल आहे?
30 जुलै 2021 रोजी रात्री सातच्या सुमारास आयसीआयसीआय बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने विरारच्या आयसीआयसीआय बँकेत दरोडा टाकून, तिथली मॅनेजर आणि सहयोगी साथीदार योगिता चौधरी-वर्तक हिची निर्घृणपणे हत्या केली होती. तर या हल्ल्यात बँकेतील कर्मचारी श्रद्धा देवरुखकरही जखमी झाली होती. नागरिकांनी अनिल दुबेला पकडून पोलिसांच्या हवाली केलं होतं.
संबंधित बातमी