एक्स्प्लोर

Vasai Crime: वसईत कायदा व्यवस्थेचे तीन तेरा, दोन कोटींची खंडणी मागत बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या हल्ला

बांधकाम व्यावसायिकाकडून दोन कोटींची खंडणी मागितली आणि त्याच्या कार्यालयावर तलवारीने हल्ला केल्याची घटना वसईत घडली आहे. 

Vasai Virar Crime: वसई विरारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं चित्र दिसून येत आहे. दोन कोटींची खंडणी मागत गुंडांनी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात एनसी दाखल केल्यानंतर गुडांनी दिवसाढवळ्या हल्ला केल्याची ही एका आठवड्यातील दुसरी घटना आहे. 

वसईच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे दोन कोटीची खंडणी मागणाऱ्या गुंडानी त्या व्यावसायिकांने पोलीस ठाण्यात तक्रार देताच दुसऱ्या दिवशी गुंडांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना नायगांवच्या जुचंद्र येथे घडली आहे. याप्रकरणी नायगांव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेत आहेत. गुंडाच्या दहशतीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. 

नायगाव येथील जूचंद्र येथे 21 जून रोजीची ही हल्लेखोरांची दहशत सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. खुलेआम तलवारीने दहशत माजवण्याचा प्रयत्न गुंड करत आहेत. जुचंद्र येथे बांधकाम व्यावसायिक जितेंद्र यादव यांचा बिंधशक्ती रियल इस्टेट अॅन्ड इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड नावाचे ऑफिस आहे. 19 जूनला आरोपी गिरीश नायर याने जितेंद्र यादव यांना फोन करुन, जमिनीसंदर्भात भेटायच बोलून भेट घेतली आणि दोन कोटीची खंडणी मागितली. 

दुसऱ्या दिवशी गिरीश नायरचे तीन गुंड आले आणि त्यांना जमिनीचे लिटिगेशन दूर करायचे असतील तर शेटला एक कोटी उद्या पाठवून द्यायला सांग नाहीतर तुझ्या ऑफीसमध्ये तुला आणि तुझ्या स्टाफला ठार मारेन असा दम दिला. त्यानंतर सायंकाळी जितेंद्र यादव यांनी याबाबतची तक्रार नायगांव पोलीस ठाण्यात दिली. मात्र नायगांव पोलिसांनी याबाबत म्हणावी तशी अॅक्शन घेतली नाही. गिरीश यादव आणि त्याच्या 10 गुंडांनी  दुसऱ्या दिवशी तलवारी आणि लोखंडी रॉडने थेट जितेंद्र यादवच्या कार्यालयावर हल्ला चढवला. जितेंद्र यादव यांच्या दोन गाड्या फोडल्या, अंकुश भुवड आणि जितेंद्र यादववर तलवारीने वार केले. दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं 

अंकुश भुवड यांच्या डोक्यावर तलवारीनचे वार लागलेत. तसचे जितेंद्र यादव यांच्या पायावर वार केले गेलेत. याबाबत जितेंद्र यादव यांनी नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपी गिरीष नायर, अहमद शेख, रियास शेख, फिरोज शेख, निलेश कांबळे, मोईद्दिन उर्फ मनी शेख, तेज उर्फ टिप्पा सोनावणे, विशाल चव्हाण, डी उर्फ जनक, रुपेश शिंदे आणि प्रथमेश दळवी या अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गिरीश याचे फोटो नितेश राणे यांच्या सोबत आहेत. पोलिसांनी 24 तास उलटूनही यात अजून एकालाही अजून अटक करण्यात आली नाही.



महत्त्वाच्या बातम्या

नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
नाशिक TCS प्रकरण! MIM च्या नगरसेवकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपी निदा खानला मदत केल्याचा ठपका 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget