T20 World Cup 2022 Live Broadcast & Streaming: भारत (India), पाकिस्तान (Pakistan), न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) हे चार संघ टी-20 विश्वचषक 2022 च्या सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडणार आहे. तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आलीय. स्टार स्पोर्ट्सचं सबस्क्रीपशन नसलेल्या लोकांनाही भारत-इंग्लंडचा सामना मोफत पाहायला मिळणार आहे. डीडी स्पोर्ट्सवर टी-20 विश्वचषकातील नॉकआऊट सामने दाखवले जाणार आहेत. 

टी-20 विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना 9 नोव्हेबर रोजी खेळला जाईल, जो न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील पहिला सेमीफायनल सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. त्यानंतर 10 नोव्हेंबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हे दोन्ही सामने डीडी स्पोर्ट्सवर मोफत दाखवले जाणार आहे.

टी-20 विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठं पाहणार?
न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय टी-20 विश्वचषक 2022 च्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.

टी-20 विश्वचषकातील नॉक आऊट सामने-

सामना संघ तारीख वेळ
पहिला सेमीफायनल न्यूझीलंड vs पाकिस्तान 09 नोव्हेंबर 2022 दुपारी 1.30
दुसरा सेमीफायनल भारत vs इंग्लंड 10 नोव्हेंबर 2022 दुपारी 1.30
फायनल - 13 नोव्हेंबर 2022 दुपारी 1.30

 

हे देखील वाचा-