Vasai Crime : वसईच्या (Vasai) नायगांव परेरा नगर रोड येथील खाडी किनारी, तिवाराच्या झाडीमध्ये ट्रॅव्हल बॅगमध्ये सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो जारी करण्यात आले आहेत. शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी 15 वर्षीय मुलीचा मृतदेह बॅगेत आढळून आला होता. या प्रकरणी वाळीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांचे अनेक पथक, तपास करत आहेत. ही मुलगी दहावीत शिकत होती. ती राहायला अंधेरी पूर्वे इथे होती. वाळीव पोलिसांनी सध्या या प्रकरणातील दोन संशयित आरोपींचे फोटो जारी केले आहेत. 


वाळीव पोलिसांनी संशयित आरोपींचे फोटो, त्यांची माहिती मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवली आहे. त्याचबरोबर गुजरात पोलिसांना देखील या आरोपींची माहिती पाठवली आहे. आरोपी संतोष मखवाना (वय 21 वर्षे) आणि विशाल अनभवणे (वय 21 वर्षे) अशी आरोपींची नावं आहे. आरोपींनी संबंधित मुलीला विशाल अनभवणेच्या जुहू येथील घराच्या वरती नेलं आणि तिथे तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिचा मृतदेह ट्रॅव्हल बॅगेत भरुन, नायगांवच्या झाडीत टाकला होता. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली होती. त्यानंतर हे दोघेही पसार झाले आहेत. त्यांच्या मागावर आता वाळीव पोलीस आहेत. आरोपींच्या अटकेनंतरच हत्येच्या कारणाचा उलगडा होईल.


काय आहे संपूर्ण घटना?
संबंधित मुलगी ही अंधेरी पूर्व इथे राहत होती. ती दहावी इयत्तेत शिकत होती. 25 ऑगस्ट रोजी मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. विलेपार्ल्यातील शाळेत जाण्यासाठी मुलगी दुपारी सव्वा अकराच्या सुमारास अंधेरीतील तिच्या घरातून निघाली. तेव्हापासून ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर 26 ऑगस्टला तिचा मृतदेह एका ट्रॅव्हल बॅगेत नायगांवच्या झाडीत आढळला होता. या प्रकरणी वाळीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोन आरोपींनी मुलीवर चाकूने वार केले. तिला अनेकदा भोसकले. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह बॅगेत भरला आणि ती बॅग वसईच्या परेरा नगर परिसरात टाकून दिली, अशी नोंद वाळीव पोलिसांनी केली आहे.


संबंधित बातम्या