एक्स्प्लोर

घरातील गहू चोरून विकायला नेताना बहिणीने थांबवले ; रागाच्या भरात भावाने कुऱ्हाडीनं घाव घातला अन् ..

काही क्षणांतच रक्ताच्या थारोळ्यात रेखा कोसळली. फक्त बहिणीवरच नव्हे तर आरोपीने स्वतःच्या आईवरही हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. राजबपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्कपूर गावात भावाने रागाच्या भरात आपल्या बहिणीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील गहू विकण्यासाठी 24 वर्षीय पुष्पेंद्र गुप्तपणे निघाला होता. त्याच्या या कृतीत अडथळा आणल्यामुळेच त्याने 22 वर्षीय बहिणी रेखाचा जीव घेतला. 

नेमकं घडलं काय?

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घरातील गहू विकण्यासाठी 24 वर्षीय पुष्पेंद्र गुप्तपणे निघाला होता. त्याच्या या कृतीत अडथळा आणल्यामुळेच त्याने 22 वर्षीय बहिणी रेखाचा जीव घेतला. रेखाने भावाला रोखण्याचा प्रयत्न करताच तो संतापला आणि जवळ असलेली कुऱ्हाड उचलून तिला लक्ष्य केले. काही क्षणांतच रक्ताच्या थारोळ्यात रेखा कोसळली. फक्त बहिणीवरच नव्हे तर आरोपीने स्वतःच्या आईवरही हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने आई वेळेत पळून गेल्याने तिचा जीव वाचला. शेजाऱ्यांच्या आरडाओरडीनंतर गावभर भीतीचं वातावरण पसरलं. घटनेनंतर त्वरित पोलिसांना कळवण्यात आलं.

गावाजवळील शेतातून आरोपी जेरबंद

दरम्यान, सहाय्यक पोलिस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि पंचनामा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ठिकाणाहून शस्त्रासह अनेक पुरावे जप्त करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. हत्येनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी तातडीची मोहीम हाती घेतली. काही तासांच्या शोधानंतर तो गावाजवळील शेतातून जेरबंद करण्यात आला. बहिणीची हत्या केल्यानंतर, आरोपी भाऊ पुष्पेंद्र घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

अर्कपूर गावात दहशत पसरली

या घटनेनंतर संपूर्ण गावात दहशतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेने अर्कपूर गावात दहशत पसरली आहे. भावाने स्वतःच्या बहिणीवर कुर्‍हाडीने वार केला, ही कल्पनाही ग्रामस्थांना अंगावर काटा आणणारी ठरत आहे. स्थानिक लोकांच्या मते, गहू विकण्याच्या किरकोळ वादातून एवढं मोठं पाऊल उचललं जाईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. गावात या घटनेनंतर चर्चेला उधाण आलं असून अशा रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे एका तरुणीचा बळी गेला आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, याबद्दल संताप व्यक्त होत आहे. पोलिस मात्र आरोपीची चौकशी करून नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget