एक्स्प्लोर

PUBG खेळू न दिल्यानं गोळ्या झाडून आईची हत्या,  मृतदेहाची दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेशमधील एका मुलाने पब्जी खेळू न दिल्यामुळे जन्मदात्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

PUBG या जीवघेण्या खेळाचं भूत तरुणाईच्या मानगुटीवरून उतरण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. उत्तर प्रदेशमधील एका मुलाने पब्जी खेळू न दिल्यामुळे जन्मदात्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर या 16 वर्षीय मुलाने मृतदेह लपवण्याचा प्रयत्नही केला. तब्बल दोन दिवस मृतदेह घरातच होता. मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी या मुलाने रुम फ्रेशनर्सचा वापर केलाय. 

पब-जी खेळू न दिल्यानं लखनौमध्ये 16 वर्षीय मुलाकडून आईची हत्या. वडिलांच्या पिस्तुलातून गोळ्या झाडून झोपलेल्या आईचा जीव घेतला. हत्या लपवण्यासाठी आईचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. रूम फ्रेशनर वापरून मृतदेहाची दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.. त्यानंतर त्यांनी त्या मुलाची चौकशी केली. तर वीज ठिक करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने हत्या केली असं सांगितलं. त्यावर पोलिसांनी 10 वर्षीय बहिणीची चौकशी केली, असता तिने वास्तव सांगितले. मृत महिलेचं नाव साधना असे आहे. 

ADCP कासिम अब्दी हे या प्रकरणाचा तापस करत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दी म्हणाले की,  16 वर्षीय आरोपी मुलाला मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचं प्रचंड व्यसन लागलं होतं. काही केल्या त्याचं व्यसन सुटत नव्हते. मृत साधना यांचे पती लष्करात जेसीओ आहेत. सध्या ते पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे कार्यरत आहेत.  साधना लखनौमधील पीजीआई येथे 16 वर्षीय मुलगा आणि 10 वर्षीय मुलीसोबत राहत होती. मुलाला लागलेलं व्यसन काही केल्या सुटत नव्हते. त्यामुळे वारंवार साधना त्याला बोलत होती. रविवारीही आईनं मुलाला मोबाईलवर PUBG खेळल्याबद्दल खडसावलं होतं, त्यामुळं रागाच्या भरात मुलानं जन्मदात्या आईची हत्या केली. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास साधना झोपली, तेव्हा मुलानं वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तुलानं आईवर गोळ्या झाडल्या. तसेच कुणालाही सांगू नकोस म्हणून बहिणीला धमकावलं. हत्या लपवण्यासाठी आईचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. रूम फ्रेशनर वापरून मृतदेहाची दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

महत्त्वाच्या बातम्या

Antilia Bomb Scare Case : अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर अखेर आरोप निश्चित
Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget