एक्स्प्लोर

Ulhasnagar Crime : लव्ह, सेक्स और धोका; पोलीस असल्यासे भासवून प्रेम, बलात्कार करून पीडितेला दिला धोका

कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पीडितेच्या तक्रारीवरून अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला.

कल्याण :  लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटासारखी कथा एका 40 वर्षीय पीडित महिलेच्या जीवनात घडली आहे. एका 33 वर्षीय आरोपीने पोलीस असल्याचे भासवून आदी मैत्री करत  पिडीतेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर बलात्कार करून पीडितेशी  लग्नास नकार देऊन  धोका दिल्याची  घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पीडितेच्या तक्रारीवरून अत्याचारासह (Crime News) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. राजेश कृष्णाबोध झा (वय 33, रा. म्हारळ गाव, कल्याण ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे  नाव आहे. 

 मिळालेल्या माहितीनुसार पीडिता उल्हासनगर कॅम्प नंबर 1 परिसरातील शहाड भागात कुटुंबासह राहते. ती एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तर आरोपी हा कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हारळ गावातील एका इमारतीमध्ये  राहतो. 22 फेब्रुवारी 2018 रोजी पीडितेच्या भावाच्या माध्यमातून आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर मैत्री होऊन पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून  बाहेर फिरण्याच्या बहाण्याने पीडितेला आरोपी नेत होता. त्यातच आरोपीने पीडितेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तुझी जात पाहून माझे कुटुंब लग्नसाठी तयार होणार नाही. तरी देखील माझ्या कुटुंबाला तयार करेल असे पीडितेला त्याने आश्वसन दिले. 

 काही दिवस आरोपी हा पीडिता राहत असलेल्या परिसरात राहण्यास होता. त्यावेळी  शारीरिक संबंधासाठी हट्ट करीत असे, मात्र त्याला पीडिता नकार देत होती. त्यानंतरही वारंवार संबंध ठेवण्यास सांगून आपण लग्न करणार आहोत.  मग मला टाळते असे सांगत पीडितेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडल्याचे पीडितने तक्रारीत नमूद केले. त्यानंतर प्रेमाच्या आणाभाका देऊन 11 ऑगस्ट 2018 ते 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत विविध ठिकाणी फिरण्याच्या बहाण्याने  पीडितेवर आरोपी अत्याचार  करत होता. 

पीडितेकडून घेतले महागडे फोन आणि  60 हजार रुपये 

 दरम्यान पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता आरोपीने घर दुरुस्ती केल्यावर लग्न करू, मात्र दुरुस्तीसाठी पैसे लागतील असे सांगून आरोपीने पीडितेकडून 60 हजार रुपये घेतले. विशेष म्हणजे पिडीतेने ही रक्कम कर्ज काढून आरोपीला दिली होती. शिवाय दोन महागडे मोबाईल फोनही पीडितेकडून आरोपीने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आळे आहे. हे मोबाईल आणि 60 हजार रुपये परत आरोपीने पीडितेला दिले नाही.  पीडितेने आरोपीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला.  मात्र त्यांनी पीडितेला अपमानित करून तू दुसऱ्या जातीची आहे. त्यामुळे आम्ही लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीला पीडितेने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो भेटण्यासाठी टाळाटाळ करून पीडितेच्या मोबाईल नंबर ब्लॉक केला.

दुसऱ्या तरुणीशी केले लग्न

त्यानंतरही पीडितेने आरोपीकडे वारंवार लग्नाचा तगादा लावला असता, मी पोलीस खात्यात असल्याचे भासवून पीडितेला धमकी देत होता. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने काही महिन्यापूर्वीच दुसऱ्या तरुणीशी गुपचूप लग्न केल्याचे पीडितेला माहिती मिळताच आपली फसवणूक करून आरोपीने धोका दिल्याने समजले. त्यानंतर 1 जून 2023 रोजी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम  376, 417, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन 27 दिवस उलटून गेली तरी देखील पोलीस आरोपी पकडत नसल्याचा आरोप पीडितेने केला असून आरोपीला तातडीने अटक करून त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. या बाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कड्यावरुन उडी घेतलेल्या मुलाची आई युट्युबर, व्हिडीओतून महत्वाची माहिती; कौटुंबिक वादाचा नवा अँगल
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
कोल्हापूर हादरलं! MD ड्रग्स निर्मितीचा गोरखधंदा उघड, तब्बल 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, कारवाईनं खळबळ  
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget