एक्स्प्लोर

रिक्षात आढळले रक्ताचे डाग, 8 KM पर्यंत तपासले CCTV; उज्जैन प्रकरणी 38 वर्षीय रिक्षाचालकाला अटक

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Ujjain Rape Case : मध्यप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवशंकर महाकालची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उज्जैनमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. संतापजनक बाब म्हणजे, अत्याचार झाल्यानंतर ही पीडित चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत तासन्तास मदतीची याचना करत तशीच फिरत राहिली. पण, भावनाशून्य समाजातून कोणीही तिच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. अखेर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं आणि या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपींचा शोध घेतला असून रिक्षाचालकासह चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

उज्जैनमधील 12 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून त्याचं वय 38 वर्ष आहे. त्यासोबतच इतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली उज्जैनच्या जीवनखेडी परिसरात ऑटोमध्ये बसली होती. सीसीटीव्ही फुटेजमधून याची पुष्टी झाली आहे. आरोपी ड्रायव्हर राकेशच्या रिक्षाची पाहणी केली असता त्याच्या रिक्षामध्ये रक्ताचे डागही आढळून आले आहेत. याच आधारे रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच, रिक्षाची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. तर, ताब्यात घेण्यात आलेल्या तीन इतर लोकांपैकी एक रिक्षाचालक आहे, तर ताब्यात घेण्यात आलेल्या इतर तीन जणांची चौकशी सुरू असून त्यांच्याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून समजलं की, घटना पहाटे 4 ते 5 वाजताच्या दरम्यान घडली. सीसीटीव्हीमध्ये दोन ऑटोरिक्षा दिसून आल्या. नीलगंगा परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या एका ऑटो ड्रायव्हर राकेशला पोलिसांनी अटक केली. तर दुसऱ्या ऑटो ड्रायव्हरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

काय घडलं नेमकं? 

पोलीस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले की,  " पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशातील असावी. तिच्याकडे कोणतेही ओळखपत्र नाही. पोलिसांना तिचे नाव आणि पत्ता नीट सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, अल्पवयीन चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी मंगळवारी इंदूरला नेण्यात आले. याप्रकरणी महाकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Buldhana Crime News: देऊळगावराजा शहरातील राड्याप्रकरणी मोठी अपडेट; दोन गटातील हाणामारी प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
देऊळगावराजा शहरातील राड्याप्रकरणी मोठी अपडेट; दोन गटातील हाणामारी प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
Harmanpreet Kaur News : वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस

Embed widget