एक्स्प्लोर

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! देशी कट्टा नव्हे तर तुर्कीच्या 'झिगाना' पिस्तुलाने दिला दगा, ऐनवेळी लॉक झाल्याने प्लॅन फसला

Tiger Shroff Attack Case : टायगर श्रॉफवरील जीवघेण्या हल्ल्याच्या तपासात खळबळजनक ट्विस्ट समोर आला आहे. हल्लेखोरांनी वापरलेली तुर्की-मेड झिगाना पिस्तूल गोळीबारादरम्यान लॉक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात दररोज नवनवे आणि खळबळजनक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. हल्लेखोरांनी गोळीबारासाठी देशी कट्टा नव्हे, तर अत्यंत महागड्या इंपोर्टेड पिस्तूलचा वापर केला होता. मात्र, गोळीबाराच्या ऐन वेळी तुर्की-मेड 'झिगाना' (Zigana) पिस्तूल लॉक झाल्याने आरोपींचा प्लॅन फिसकटला आणि मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी दोन्ही पिस्तूलं गुजरातमधून जप्त केली असून, ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर टायगर श्रॉफ तीव्र मानसिक धक्क्याखाली असून तो प्रचंड अस्वस्थ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या जुहू येथील पुष्पा पार्क परिसरात रविवारी तीन हल्लेखोरांनी टायगरच्या कारवर अंधाधुंद गोळीबार केला होता. माझं कोणाशीही वैर नसताना माझ्यावर हल्ला का झाला? असा सवाल टायगरने पोलिसांना विचारल्याची माहिती आहे. मानसिक धक्का बसल्यामुळे मुंबई गुन्हे शाखेला अजूनही त्याचा सविस्तर जबाब नोंदवता आलेला नाही.

Tiger Shroff Case Arrests : इंदूरमधून 11 वा आरोपी अटकेत

या हाय-प्रोफाइल प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आणखी एका आरोपीला इंदूरमधून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या आता 11 वर पोहोचली आहे. या आरोपीने इतर हल्लेखोरांना रसद आणि मदत पुरवल्याचा संशय आहे. त्याला लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. दुसरीकडे, किल्ला कोर्टाने जतीन, समीर आणि अंकित या तिन्ही आरोपींना 28 तारीखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Signal Telegram App Conspiracy : चॅटिंग अॅप्सवरून सूचना अन् टीव्ही न्यूजवरून मेसेज

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अमृतसरमधून पिस्तूल आणणाऱ्या कुणाल आणि सुमित या आरोपींना पिस्तूल ठेवलेल्या जागेचे लोकेशन आणि फोटो पाठवण्यात आले होते, जे नंतर लगेचच डिलीट करण्यात आले. आरोपींशी संपर्क साधण्यासाठी सिग्नल, टेलिग्राम, मोबाईल नंबर आणि झिंगाडा अॅप्सचा वापर करण्यात आला होता. सर्व सूचना अनिल पंडित नावाचा हँडलर देत असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, टीव्हीवर बातम्या प्रसारित होताच "चेहरे समोर आले आहेत, पळून जा" अशा सूचना हँडलर्सकडून आरोपींना दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai ACB Trap Worli : राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Rohit Pawar : रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
Satara FDA Action: तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
तुकाराम मुंढे यांच्या FDAचा आता हॉटेलकडे मोर्चा; महाबळेश्वरच्या तीन नामांकित हॉटेलवर कारवाई, पाच हॉटेल्सला नोटीसा बजावल्या, नेमकं कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget