Latur Crime News लातूर : लातूर (Latur Crime) शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात शहरातील एका नामांकित वस्तीगृहात तेरा वर्षाच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वस्तीगृहासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, चार दिवसपूर्वी हा विद्यार्थी हॉस्टेलमधून पळून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेत सोमवारी सकाळी त्याला होस्टेलमध्ये वापस आणण्यात आलं होतं.


परिणामी, हाच राग मनात धरून या विद्यार्थ्यांने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र मृतकाच्या नातेवाईकांनी ही घटना आत्महत्यानसून घातपाताचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही आत्महत्या नसून खूनच असल्याबाबत नातेवाईकांनी आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.


आत्महत्या की घातपात? 


 या घटनेतील तेरा वर्षीय विद्यार्थी परळी तालुक्यातील पांगरी या गावाचा तो रहिवासी आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी त्याला लातूरच्या स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे दाखल केलं होतं आणि शाळेच्या हॉस्टेलमध्येच तो राहत होता. या होस्टेलमध्ये एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मृत विद्यार्थाचे भविष्य घडवण्यासाठी आई-वडिलांनी त्याच्या मनाविरुद्ध त्याला शाळेत दाखल केलं होतं. चार दिवसांपूर्वी अरविंद शाळेतून पळून गेला होता. सोमवारी सकाळी मृत विद्यार्थाच्या घरच्यांनी त्याला होस्टेलमध्ये वापस आणलं. सोमवारी रात्री त्याने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये जात स्वेटर ने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मनाविरूद्ध त्याला हॉस्टेलमध्ये दाखल केल्यान त्याच संतांपातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावं, असा तर्क लावण्यात येत आहे. तर ही आत्महत्याची घटना नसून खून झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.


इन कॅमेरा होणार  पोस्टमार्टम  


घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी मृतकाच्या घरी निरोप दिला. त्यानंतर लातूरमधील त्याचे नातेवाईक हे हॉस्टेलमध्ये दाखल झालेत. सध्या एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. लातूरच्या एमआयडीसी भागातील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल आहे. शाळेच्या बाजूलाच वसतिगृहाची इमारत असून हे एक हजार विद्यार्थ्यांचे हे वसतिगृह आहे. या वस्तीगृहात अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. तर ही आत्महत्यानसून घातपात आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतलीय. या प्रकरणी दोशींवर कडक कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ही नातेवाईकांनी घेतली आहे. आज या घटनेचा इन कॅमेरा पोस्टमार्टम होणार आहे. 


हे ही वाचा