Akola Amol Mitkari vs MNS : अकोला : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान, तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. दोघांनाही अटकेनंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अद्याप फरारच अहेत. दुनबळे यांनीच मनसैनिकांना मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती लागला आहे. या प्रकरणात एकूण 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दुनबळेंसह 10 आरोपी अद्याप फरार आहेत.


राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणानंतर अमोल मिटकरींनी पोलीस स्थानक गाठलं आणि तिथे ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा अमोल मिटकरी यांनी घेतला. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आणि मिटकरींनी आपलं आंदोलन मागे घेतलं. 


राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू 


राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. मनसे कार्यकर्त्यांनी मोठा राडा घातला. या राड्यामध्ये मनसे पदाधिकारी जय मालोकार हेदेखील सहभागी होते. राड्यानंतर  जय मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत होतं, त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. 


राड्यानंतर आणखी दोन मनसे पदाधिकाऱ्यांना अस्वस्थ वाटू लागलं 


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडी तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आली आहे. पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमधून रात्री उशीरा साबळे आणि भगत यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. दोघांनाही अटक केल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यानं उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अद्याप फरारच अहेत. या प्रकरणात एकूण 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेयेत. यातील जय मालोकार या आरोपीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रात्री मृत्यू झाला. दुनबळेंसह 10 आरोपी अद्याप फरार आहेत.


पाहा व्हिडीओ : Akola Amol Mitkari vs MNS : अमोल मिटकरींविरोधात मनसैनिकांना चिथवणारा मनसे नेत्याचा व्हिडीओ