Pune Crime News: पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणी (Pune Crime News) केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात गुन्हेगारांना वर्दीची भीतीच राहिली नसल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यात (Pune Crime News) पिझ्झा दिला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात घडला आहे. ही घटना 28 जुलै रोजी खराडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव या चौघांवर (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल बंद करुन मालक निघाला होता. त्यानंतर हे चौघे त्या हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पिझ्झा मागत होते. हॉटेल मालकाने हॉटेल बंद झाल्याचं सांगितलं याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 28 जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली आहे.
जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा केला खून
काही दिवसांपुर्वी पुण्यात(Pune Crime News) क्षुल्लक कारणामुळे कूक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा उंड्रीमध्ये खून केल्याची माहिती समोर आली आहे. कूकच्या नाकावर आणि डोक्यावरती हातोड्याने वार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या खून प्रकरणात कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून एकाला पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या शुभम शास्त्री सरकार नावाच्या कूकच्या नाकावर व डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर हल्ला झालेल्या कूकला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्या असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं