Bhiwandi Latest Marathi Crime News Update : मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी केवळ पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून मदरशातील मौलवी शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.  खळबळजनक बाब म्हणजे त्या अल्पवयीन विद्यार्थाला 70 सेकंदात 70 छडीचे फटके मारताना व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी तीन महिन्यानंतर निजामपुरा पोलीस (Police) ठाण्यात विविध कालमानुसार मौलवी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहाद भगत नुरी (वय 32, रा, भरूच , गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या मौलवी शिक्षकाचे नाव असून तो फरार झाला आहे. 


पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार 14 वर्षीय पीडित विद्यार्थी हा भिवंडी (Bhiwandi) शहरातील मिल्लत नगर भागात असलेल्या दारुल उलूम हसनैन करीमॅन 'दिनी मदारशात शिक्षण घेत आहे. हा विद्यार्थी 24 नोव्हेंबर 2022 रोजी नेहमीप्रमाणे  मदारशात सकाळच्या सुमारास गेला होता. त्यावेळी आरोपी मौलवी शिक्षकाने त्याला पाठांतर करण्यास सांगितले होते. मात्र, या विद्यार्थ्याचे पाठांतर झाले नव्हते.  पाठांतर व्यवस्थित करीत नसल्याच्या कारणावरून हा मदरशातील मौलवी शिक्षक संतप्त झाला. या संतापातूनच अल्पवयीन विद्यार्थ्याला या मौलवी शिक्षकाने अमानुषपणे काठीने बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरिरावर अंगावर जखमा झाल्या. मात्र या धक्कादायक बेदम मारहाणीची घटना त्यावेळी दडविण्यात आली होती. तर दुसरीकडे मौलवी शिक्षकाच्या मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर उपचार सुरू होते.  


या बेदम मारहाणीच्या  घटनेचा व्हिडिओ काही दिवसापूर्वीच व्हायरल झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर म्हणजे 26 फेब्रुवारी 2023 रोजी मिल्लत नगर मधील दर्गा ट्रस्टी नूरअली हसन अली सय्यद ( वय 63) यांच्या तक्रारीवरून मौलवी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात मुलांची काळजी आणि संरक्षण 2015 चे कलम 75 प्रमाणे आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 324, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण आरोपी मौलवी शिक्षकाला लागली. त्यानंतर आरोपी फरार झाला आहे. आरोपीचा शोध पोलीस पथक घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. के. दळवी करीत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :