एक्स्प्लोर

शॉकिंग! उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत गोळीबार अन् तलवारीनं हल्ला, दोघे गंभीर जखमी, पोलिस पथकं अलर्ट

Ulhasnagar Crime: घटनेनंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

Thane Crime: उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनी परिसरात घडली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कौटुंबिक वादातून ताण वाढला

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि पीडित कुटुंबातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. सोमवारी रात्री अचानक तणाव वाढला आणि वाद चिघळताच आरोपींनी शस्त्रांचा वापर करून हल्ला केला. यामध्ये एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला, तर दुसऱ्याला तलवारीने वार करून जखमी केले. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याला तात्काळ ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसऱ्या जखमीवरही उपचार सुरू आहेत.

पोलिसांचा तपास आणि हल्लेखोरांचा शोध

घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.या संदर्भात डीसीपी सचिन गोरे म्हणाले कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. आम्ही आरोपींची ओळख पटवली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेनंतर उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हिललाइन पोलिसांकडून सुरू आहे.

बदनामी झाल्यानं अल्पवयीन मुलीनं गळ्याला लावला दोर

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इन्स्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी झाल्यामुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. दोघे संशयित कॉलेजमध्ये वेळोवेळी येऊन तिला आरोपी सोबत जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडत होते.

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget