एक्स्प्लोर

सोलापुरातील निता रेसिडन्सीमध्ये शिक्षिकेची हत्या, हत्येच्या आरोपात महिलेच्या पतीला अटक

सोलापुरातील निता रेसिडन्सीमध्ये शिक्षिकेची हत्या करण्यात आली आहे. पती-पत्नी दोघेही उच्च शिक्षित तसेच कमावणारे असताना टोकाचे पाऊल का उचचलले याचा शोध पोलिस घेत आहेत.

सोलापूर : जुळे सोलापुरातील चंदन नगर परिसरातील निता रेसिडन्सीमध्ये एका शिक्षकेची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात महिलेच्या पतीला हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिस आयुक्तालयातील वरीष्ठ पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ पंचनामा आणि प्राथमिक चौकशी करुन सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आरोपी पतीविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्चना विकास हरवाळकर (वय 35)असे मृत शिक्षकेचे नाव आहे. अर्चना हरवाळकर आणि त्यांचे पती विकास हरवाळकर हे आपला मुलगा वेदांत (वय 6) याच्यासह जुळे सोलापुरातील निता रेसिडन्सी येथे राहावयास होते. सकाळी 10.46 वाजता विकास हरवाळकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर काही मजकूर लिहिण्यात आला होता. यावरुन आरोपी विकास हरवाळकर यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या प्रणय कांबळे यांना संशय आला. त्यामुळे प्रणय कांबळे यांनी तात्काळ इतर नातेवाईकांशी संपर्क साधून विकास हरवाळकर यांच्या घराकडे धाव घेतली.

ज्यावेळी फिर्यादी प्रणय कांबळे यांना विकास हरवाळकर यांच्या घराची बेल दाबली आणि दरवाजा ठोठावला त्यावेळी आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. प्रणय यांच्या आवाजामुळे शेजारी राहणारे देखील जमा झाले. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजाची लोखंडी जाळी काढून, लाकडी दरवाज्याला धक्का मारुन उघडले असता आरोपी विकास हरवाळकर हा समोर आला. त्यावेळी त्याच्या टि शर्टवर रक्ताचे डाग दिसून आले. फिर्यादी प्रणय कांबळे याला संशय आल्याने आत खोलीत जाऊन पाहणी केली असता आरोपी विकास हरवाळकर याची पत्नी अर्चना ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे पत्नीच्या हत्येच्या आरोपात विकास हरवाळकर यांच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी विकास हरवाळकर आणि मयत अर्चना हरवाळकर हे दोघेही सोलापूर जिल्हा परिषदेचे शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य़रत होते. दोघांनी जवळपास 7 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघेही अक्कलकोट तालुक्यातील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना सहा वर्षाचा एक मुलगा देखील आहे. अवघं तिघांचं कुटुंब आणि दोघेही उच्च शिक्षित तसेच कमावणारे असताना विकास यांने टोकाचे पाऊल का उचचलले याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विकास याने स्वत: विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले होते.दरम्यान या प्रकरणाचा सविस्तर तपास सपोनि शितलकुमार कोल्हाळ करत आहेत.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget