एक्स्प्लोर

फक्त महिलांचे अॅप जिथे पुरुषांवर 'तसली' चर्चा व्हायची, Tea App हॅक; 72 हजार फोटो चोरले, लोकेशनसह प्रायव्हसीही धोक्यात

Tea App Hack : हॅकर्सनी फक्त महिलांचे फोटोच नव्हे तर काही वापरकर्त्यांची लोकेशन माहितीही ऑनलाइन लीक केली आहे. त्यामुळे या अॅपवरील महिलांची प्रायव्हसी धोक्यात आली आहे.

Tea app Hacking : फक्त महिलांसाठी असलेल्या, डेटिंगबाबत सल्ला देण्यासाठी बनवलेला जगप्रसिद्ध Tea अ‍ॅप हॅक झाल्याचं समोर आलं आहे. त्या माध्यमातून महिलांचे तब्बल 72,000 हून अधिक फोटोज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांना सुरक्षित डेटिंगसाठी प्लॅटफॉर्म देणाऱ्या या अॅपसमोर प्रायव्हसीचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

टी अ‍ॅपवर महिला त्यांच्या ओळखीच्या पुरुषांची माहिती, फोटोज शेअर करायच्या, त्याचे चांगले वाईट अनुभव सांगायच्या. रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग यासारख्या टर्म्स वापरून त्या इतर महिलांना सावध करायच्या. पण आता हे सगळं उलटण्याची शक्यता आहे. कारण हॅकर्सनी दोन वर्षांपूर्वीचा डेटाबेसही उघड केला आहे.

Tea App Hack : डेटा चोरी, लोकेशन लीक आणि प्रचंड गोंधळ

एनबीसी न्यूजच्या अहवालानुसार, हॅकर्सनी फक्त फोटोच नव्हे तर काही वापरकर्त्यांची लोकेशन माहितीही ऑनलाइन लीक केली आहे. एक गुप्त मोहीम Hack & Leak अंतर्गत ही सगळी माहिती लीक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एक वापरकर्ता या मोहिमेच्या अंतर्गत चोरलेल्या डेटाबेसचे लिंकही ऑनलाइन पोस्ट करताना दिसला.

What Is Tea App : सर्वाधिक डाऊनलोड होणारे अॅप

या अॅपमध्ये साईन करण्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी त्या महिलेला स्वतःचा सेल्फी पाठवावा लागायचा. कंपनीने दावा केला होता की व्हेरिफिकेशनसाठी वापरल्या गेलेल्या सेल्फीज डिलीट केल्या जातात, स्क्रीनशॉट्सही ब्लॉक होते, आणि वापरकर्त्याचं फक्त युजरनेम पब्लिक असतो. पण संरक्षणाचे हे सगळे दावे फोल ठरले आहेत. सध्या हे अ‍ॅप Apple Store वर सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या फ्री अ‍ॅप्सपैकी एक होते आणि अवघ्या एका आठवड्यात 10 लाखांहून अधिक महिलांनी साइनअप केलं होतं.

टी अ‍ॅपच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित उपाय सुरू केले आहेत. वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

डिजिटल प्रायव्हसीचं संकट वाढतंय

ही घटना केवळ टी अ‍ॅपपुरती मर्यादित नाही, तर डिजिटल युगात प्रायव्हसीवरील वाढता धोका अधोरेखित करते. अनेक महिलांनी सुरक्षित प्लॅटफॉर्म समजून अ‍ॅपवर खाजगी माहिती शेअर केली होती. पण आता तीच माहिती त्यांच्या विरोधात वापरली जाऊ शकते.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Sangli Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget