Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत केली आहे. पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात आज (दि.20) अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाटात एका खाजगी बसच्या झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 27 जखमी जण जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी दिली.






ताम्हिणी  घाटात कोंडेसर गावाजवळ खाजगी बसचा अपघाता झाला, यात 5 जणांचा मृत्यू झाला आणि 27 लोकं जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी सभागृहात निवेदन केले आणि मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली असल्याचे भरत गोगावलेंनी सांगितले आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. अपघात कुठेही झाला तरी महाराष्ट्रातील जनता आहे त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी पार पडले असल्याचेही गोगावले म्हणाले. 


खाजगी बस घाटात पलटी झाल्याने ताम्हिणी घाटात भीषण अपघात 


पुण्यावरून रायगड दिशेकडे येत असताना तीव्र उतारावर अंदाज न आल्याने एका खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. अपघातात एकूण 45 प्रवाशी प्रवास करत होते.... 25 हून अधिक प्रवाशी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.  अपघातस्थळी माणगावमधील रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर मदतकार्य सुरु झाले. मात्र, तोपर्यंत 5 जणांनी जीव गमावला होता.             
 
रायगडच्या ताम्हिणी घाटात एका खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात बस मधील काही  प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. पुण्यावरून रायगडच्या दिशेकडे येत असताना ताम्हिणी घाटातील तीव्र वळणावर ही बस कलंडली आणि अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण 45 प्रवाशी   या बसमधून प्रवास करत होते. त्यामधील बरेचसे प्रवासी जखमी असल्याची माहिती कळते आहे. काही प्रवाशी बसखाली अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघात स्थळी रुग्णवाहिका दाखल झाली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ambadas Danve : मोठी बातमी ! वाल्मिक कराड 4 दिवसांपासून नागपुरातील फॉर्म हाऊसवर, त्यांचा पत्ता देतो, विधानपरिषदेत दानवे कडाडले