एक्स्प्लोर

Pratibha Chakankar On Ashok Kharat: प्रतिभा चाकणकर म्हणाल्या, माझ्या नावाची बनावट खाती; आता सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत सवाल

Pratibha Chakankar On Ashok Kharat: शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली.

Pratibha Chakankar On Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरांच्याही (Pratibha Chakankar) अडचणीत मोठी वाढ झाली. शिर्डी पोलिसांकडून काल प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला. सख्ख्या बहिणी असणाऱ्या रुपाली आणि प्रतिभा या सख्ख्या जावादेखील आहेत. 

माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवर पोस्ट करत विविध सवाल उपस्थित केले आहेत. आम्ही एसआयटीला भेटायला गेलो होतो एसआयटी या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्या लगतपर्यंतचे सगळे गेट लॉक केले होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पसमध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये हे प्रिवीलेज का मिळाले? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाहीय, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारेंचे 6 धडधडीत प्रश्न- (Sushma Andhare On Ashok Kharat Case)

पुढे सुषमा अंधारेंनी 6 महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. यामध्ये 1. जर अंजली दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच म्हणणं आहे. तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? 2. दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? 3. पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वकिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते ? 4. स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियांनी सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकरांमध्ये 236 कॉल 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा enjoy period संपत का नाही? 5. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावलं जाणार आहे ? 6. कोण कुणाला वेड्यात काढत आहे? चाकणकर एसआयटीला ? दमानिया महाराष्ट्राला? SIT पीडित महिलांना?...कळसुत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे..., असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

संबंधित बातमी:

Ashok Kharat : देवदर्शनासाठी खरातनं कागदपत्रं घेतली आणि बनावट खाते उघडून कोट्यवधींचे व्यवहार केले; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा दावा, आरोप फेटाळले

 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sahil Wakode : साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
Nalasopara Crime : पैशांच्या व्यवहारावरून वाद, शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
पैशांच्या व्यवहारावरून वाद, शिवीगाळ अन् दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकासह 5 जणांवर गुन्हा दाखल
Nagpur Accident News: नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू
नागपूर-अमरावती रोडवर भीषण अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, कामगाराचा जागीच मृत्यू
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन
सीलबंद पोत्यात खताचं वजन कमी, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक; हमालाचा व्हिडिओ व्हायरल, राजू शेट्टींचा फोन

व्हिडीओ

Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?
Maharashtra Leader On Gyanesh Kumar : राज्यातील नेत्यांचे निवडणूक आयोगाच्या ज्ञानेश कुमारांवर तोशेर; कोण काय बोललं? Special Report
Uddhav Thackeray on Drought : 31 हजार कोटींमधली किती मदत शेतकऱ्यांना पोहोचली?
Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahil Wakode : साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
SIR प्रक्रियेत महाराष्ट्रात ज्या मतदारांची नावे वगळली ती नावे पूर्ववत करा...' राज्यातील SIR प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, दोन निवडणूक आयुक्तांच्या विरोधाचा दिला दाखला!
Vidyanand Bapat Pune : राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
राजकारणात जाणार का? पुढची भूमिका काय? विद्यानंद बापट स्पष्टच बोलले; म्हणाले, 'उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग...'
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांनो लक्ष द्या! विसर्जन मिरवणुकीसाठी आज 17 प्रमुख रस्ते बंद; कोणते मार्ग बंद अन् कुठले रस्ते सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर
Student Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी 12 सदस्यांच्या समिती
मोठी बातमी! महाराष्ट्रातील महाविद्यालयांत पुन्हा विद्यार्थी निवडणुकांचे वारे घुमणार; सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार, आराखडा तयार करण्यासाठी समितीला एका महिन्याची मुदत
Mumbaicha Raja Visarjan Miravnuk 2026: मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, परळचा राजाही निघाला; पाहा 10 फोटो
Embed widget