Buldhana News बुलढाणा : खरीपाच्या पेरण्या तोंडावर बियाणे आणि खतांचा काळाबाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. मागील वर्षी बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांमध्ये बोगस खते विक्रीचे (Prohibited Seeds) अनेक प्रकार आढळले होते. काही ठिकाणी सक्तीही केल्या जात होती. यावर्षी असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कृषी विभागाने तत्पर पावले उचलले आहेत. नियमानुसार जे कृषी केंद्र खते आणि  बियांण्याची विक्री करीत नसतील, अशावर कारवाई करण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले असून जिल्ह्यातील 65 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर चार कृषी केंद्रांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. तर त्यातील  207 कृषी केंद्रवर खते बियाण्यांच्या विक्रीस बंदी घातली आहे. या कारवाईने कृषी केंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


207 कृषी केंद्रांवर निर्बंध, 65 चे परवाने रद्द तर चार निलंबित


खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. अशातच राज्यात बोगस बियाणांचा (Prohibited Seeds) सुळसुळाट असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतांना खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा इत्यादि जिल्ह्यात बियाणांचा काळाबाजार सुरूच असल्याचे चित्र आहे.


अशातच आता प्रशासन या प्रकरणामुळे सतर्क होऊन कारवाईचा बडगा उगारत असताना दिसत आहे. अशीच एक धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्यात कृषी विभागाने केली आहे. यात जिल्ह्यातील 65 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर चार कृषी केंद्रांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. तर त्यातील 207 कृषी केंद्रवर खते बियाण्यांच्या विक्रीस बंदी घातली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 


कापशी बियाणांच्या विक्रेत्यांकडून काळाबाजार


खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतकरी वर्गाकडून बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. परंतु बहुतांश कृषी केंद्रांतून मागणी असलेले कपाशी वाण तुटवड्याचे कारण दाखवून जादा भावाने विकले जात आहे. या प्रकाराकडे कृषी अधिकाऱ्यांची डोळझाक पणाची भूमिका घेत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागील कारण म्हणजे, 864 रुपयांची बैंग 1300 ते 1500 हजारांपर्यंत गेली असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांना बिल मात्र 864 रुपयांचे दिले जात असल्याचे चित्र आहे.


कपाशीचे तुलसी कंपनीचे कबड्डी, पंगा, अजित 155, अजित 05, ऍग्रिसिड 7076, राशी सिड्स 659, राशी सिड्स 779, स्विफ्ट, प्रवर्धन सीडलेस एक्स, प्रवर्धन रेवंत या सर्व बियाणांची कृत्रिम तुटवडा भासविण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून, शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीवर्गातून केली जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या