Jallikattu 2022: तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू खेळादरम्यान उधाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एका 18 वर्षाचा तरूणाचा मृत्यू झालाय. तर, 80 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. पोंगल सणानिमित्ताने राज्यातील अनेक भागात जल्लीकट्टू स्पर्धेचं आयोजन केलं जातं. जल्लीकट्टू हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील एक पारंपारिक खेळ आहे. जो पोंगल सणाच्या वेळी आयोजित केला जातो, जिथे बैलांची माणसांशी लढाई केली जाते. मात्र, हा खेळ अनेकदा जीवघेणा ठरलाय.
आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुराई येथील अवनियापुरम भागात जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान एका तरुणाला जीव गमवावा लागला, तर किमान 80 जण जखमी झाले आहेत. बालमुरुगन असं मृत तरुणाचं नाव आहे. या स्पर्धेदरम्यान, बैलानं त्याच्या छातीवर छिंग मारली. ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली. बालमुरुगनला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलंय.
अवनीपुरमचा कार्तिक विजयी
ही एकदिवसीय पारंपारिक क्रीडा स्पर्धा सायंकाळी 5:10 च्या सुमारास संपली. 24 बैलांवर ताबा मिळवत अवनीपुरमचा कार्तिक पहिल्या क्रमांकावर राहिला. या मोसमात स्पर्धेचा विजेता ठरलेल्या कार्तिकला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्याने कारही जिंकलीय. जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान गेल्या वर्षी कार्तिकनं 16 बैलांवर नियंत्रण मिळवलं होतं.
जलीकट्टू स्पर्धेला प्राणीप्रेमी संघटनेचा विरोध
प्राणीप्रेमींच्या संघटनेच्या आवाहनावरून सर्वोच्च न्यायालयानं 2014 मध्ये जलीकट्टू स्पर्धेवर बंदी घातली होती.प्राण्यांची क्रूरता, शेकडो लोक जखमी आणि प्राणहानी यांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याला सर्वत्र स्तरातून विरोध दर्शवण्यात आला. दरम्यान, तामिळनाडूनं परंपरा आणि विश्वासाचा हवाला देत या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. अखेर एका अध्यादेशाद्वारे खेळाची परंपरा पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.
हे देखील वाचा-
- Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 402 जणांचा मृत्यू
- संयुक्त किसान मोर्चाची सिंघू बॉर्डरवर आज बैठक, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा निघणार?
- India China Trade : सीमेवर तणाव असतानाही भारत-चीनमधील व्यापार विक्रमी, 2021मध्ये 125 अब्ज डॉलरचा व्यापार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha