Sonam Raghuvanshi Case : इंदूरहून मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यातील पती राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचा सूत्रधार खुद्द त्याची पत्नी सोनम रघुवंशी असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून, मुख्य आरोपी सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे.

Continues below advertisement


अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींमध्ये इंदूरचा रहिवासी आणि सोनमचा प्रियकर राज कुशवाह, तसेच विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांचा समावेश आहे. 2 जून रोजी मेघालयमध्ये राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर सात दिवसांनी, सोमवारी सोनम गाजीपूरमधील एका ढाब्यावर अस्वस्थ अवस्थेत सापडली होती. 


तपासादरम्यान उघडकीस आले की, सोनमने राजाची हत्या करण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत आणि नोकरीचे आमिष दिलं होतं. हे आमिष स्वीकारूनच त्यांनी खून करण्याचे कट कारस्थान रचले आणि त्याची अंमलबजावणी केली. तर सोनम रघुवंशीच्या लग्नात तिचा प्रियकर राज कुशवाह देखील उपस्थित होता, अशी माहिती समोर येत आहे.   


सोनमच्या वडिलांच्या कंपनीत राज करायचा काम


अटक केलेला मुख्य आरोपी राज कुशवाहा सोनमच्या वडिलांच्या कंपनीत काम करत होता. दुसरा आरोपी विशाल चौहान इंदूरमध्ये रॅपिडो चालक म्हणून काम करतो, तर तिसरा आरोपी आकाश राजपूत सध्या बेरोजगार आहे. तपासात समोर आले आहे की, सोनमने तिघांनाही 14 लाख रुपयांचे आमिष दिले होते. याशिवाय, आपल्या वडिलांच्या कंपनीत नोकरी देण्याचेही आश्वासन तिने आरोपींना दिले होते.


सोनमच्या लग्नात राज ढसाढसा रडला


तर सोनम रघुवंशीच्या लग्नात राज कुशवाहा देखील उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे. लग्नाच्या वेळी जेव्हा सोनम स्टेजवर आली, तेव्हा राज अचानक रडू लागला. हे पाहून कुटुंबातील सदस्य काहीसे आश्चर्यचकित झाले होते. राज इतका भावूक का झाला? असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, राज सोनमच्या वडिलांच्या कंपनीत काम करत असल्याने, दोघांमध्ये कामाच्या निमित्ताने जवळीक निर्माण झाली असावी, अशी समजूत कुटुंबीयांनी करून घेतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनमचं लग्न ठरल्यावरही ती राजला भेटत राहिली. असंही सांगितलं जात आहे की, सोनमने राजला आश्वासन दिलं होतं की, "मी जरी राजाशी लग्न करत असले, तरी तुझी प्रेयसी म्हणून कायम तुझ्यासोबत राहीन."  



आणखी वाचा


Sonam Raghuvanshi Case Meme: दरवाजा उघडून बिग बी बाहेर पळाले, VIDEO व्हायरल; राजा रघुवंशी प्रकरणानंतर मीम्सच्या जगात उडाला गोंधळ