Raja Raghuvanshi Murder Case: इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणानं (Indore Raja Murder Case) अख्खा देश हादरला. सोशल मीडियावर (Social Media) बॉलिवूड (Bollywood Movies) चित्रपटांमधील काही सेकंदांच्या व्हिडीओंचा वापर करुन मीम्स बनवले जात आहेत. मीम्स क्रिएटर्सनी बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या सिनेमांचे व्हिडीओ या प्रकरणाशी जोडून व्हायरल केले आहेत. या मीम्समध्ये अमिताभ बच्चन ते अजय देवगण सारख्या सुपरस्टारचे व्हिडीओ मीम्स क्रिएटर्सनी वापरले असून सध्या हे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोलीस आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला 7 दिवसांच्या रिमांडवर घेऊन चौकशी करत असताना, दुसरीकडे, मीम्सच्या जगात नेटिझन्सनी या प्रकरणाला वेगळाच अँगल दिला आहे.
सोनम रघुवंशी प्रकरणाला जोडून व्हायरल केले जातायत मीम्स
राजा रघुवंशी हत्या प्रकरणाशी संबंधित सर्वाधिक व्हायरल मीम्समध्ये अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल केला जात आहे. आपल्या सर्वांना अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट 'दिवार' मधला तो सीन आठवत असेल, ज्यामध्ये अमिताभ बच्चन म्हणतात की, 'तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूं...'. हा डायलॉग म्हटल्यानंतर, बिग बी गुंडांना दोन्ही हातांनी पछाडतात आणि अत्यंत थकलेल्या अवस्थेत दार उघडून बाहेर येतात.
दार उघडून बाहेर पडतानाचा दीवारमधला हा सीन नेटकऱ्यांनी हेरला आणि त्याला राजा रघुवंशी हत्या प्रकरणाशी जोडून व्हायरल केला. त्यासोबत सोनम रघुवंशी-राजा रघुवंशी प्रकरणाशी संबंधित हॅशटॅग वापरले. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "कुछ नहीं भाई हनीमून के बाद जिंदा वापस आ गया."
नेटकऱ्यांच्या मजेशीर रिअॅक्शन्स
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेटिजन्स हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट करतायत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या या व्हिडीओला 50 हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत.
अजय देवगणचा व्हिडीओही होतोय व्हायरल
'हम दिल दे चुके सनम'चाही एक व्हिडीओ याच केसशी जोडून नेटकरी व्हायरल करत आहेत. या व्हिडीओमध्ये अजय देवगण ऐश्वर्या रायला खेचून घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "बोल रही थी शादी के बाद हनीमून पर मेघालय जाउंगी, मैं तो नहीं जाउंगा..."
राजा रघुवंशी हत्या प्रकरण नेमकं काय?
सोनम आणि राजा यांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी दोघांनीही मेघालयातील शिलाँगला जाण्याचं ठरवलं. त्यानं दोघेही अचानक गायब झाले. देशभरात हे प्रकरण चर्चेत आलं. दोघांचाही शोध प्रशासनाकडून सुरू झाला. त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयात एका खोल दरीत आढळून आला. मात्र, त्याच्या पत्नीचा काहीच थांगपत्ता नव्हता. सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरजवळील एका ढाब्याजवळ सापडली. मीडिया रिपोर्टनुसार, सोनमवर तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच, तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :