Dipika Kakar First Vlog After Surgery: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री (Television Actress Dipika Kakar) दीपिका कक्कड (Dipika Kakar) हिला दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं (Stage 2 Liver Cancer) निदान झाल्याचं आढळून आलेलं. अलिकडेच, अभिनेत्रीवर 14 तासांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे ती तीन दिवस आयसीयूमध्ये होती. दीपिका कक्करचा पती शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) यांनं यापूर्वी अभिनेत्रीची हेल्थ अपडेट शेअर केलेली आणि तिला आयसीयूमधून बाहेर आणल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. आता दीपिकानं स्वतः व्लॉगद्वारे तिच्या आरोग्याची माहिती दिली आहे.
शोएब इब्राहिमनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हॉस्पिटलमधून एक नवा व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये, शोएब स्वतः आपल्या प्रकृतीबद्दल सांगताना दिसतो. तसेच, तो आता दीपिकानं नॉर्मल डाएट घ्यायला सुरुवात केल्याचंही सांगतो. आता दीपिकाची तब्ब्येत फारच सुधारल्याचंही त्यानं सांगितलं. त्यानंतर शोएब दीपिकावर कॅमेरा फिरवतो, मग स्वतः दीपिका सर्वांशी बोलते आणि तिच्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार मानते.
दीपिका कक्करनं मानले चाहत्यांचे 'आभार'
दीपिका कक्कर म्हणते की, "मी तुमच्याशी आरामात बोलेन, यावेळी मी फक्त एवढंच म्हणेन की, तुम्ही लोकांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली. त्यासाठी मी मनापासून खूप खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. हॉस्पिटलमध्येही, हॉस्पिटल स्टाफ, सिस्टर्सही मला भेटून आधार देत आहेत. मला सतत सांगतायत, मॅम तुम्ही बऱ्या व्हाल, मॅम तुम्ही बऱ्या व्हाल. इथे असलेल्या इतर रुग्णांचे नातेवाईक म्हणत आहेत की, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. तुम्हीही बरे व्हाल. याचा अर्थ त्या कोणाच्या तरी मुली आहेत, कोणाच्या तरी वडील आहेत. बाकीचेही माझ्यासाठीही प्रार्थना करत आहेत."
दीपिका कक्करनं दिली हेल्थ अपडेट
दीपिका कक्कप पुढे म्हणते की, "या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्यासाठी मी मनापासून खूप खूप आभारी आहे. अलहमदुलिल्लाह मला आता खूप बरं वाटतंय. माझी व्यवस्थित रिकव्हरी सुरू आहे. मला थोडासा खोकला होता. शोएबनं जसं सांगितलं की, त्यामुळे माझी तब्येत काहीशी खालावलेली. पोटाच्या भागात टाके असल्यानं खोकल्यावर त्यावर खूप ताण येत होता. पण आता मी खूप बरी आहे , आता बस्स एवढंच, बाकीचं आरामात बोलू."
महत्त्वाच्या इतर बातम्या :