एक्स्प्लोर

Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं

Solapur Excise Officers : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडून धाबेवाल्याला मारहाण केल्यानंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांनाच चोप दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Madha News : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि एका धाबेवाल्यामध्ये झालेल्या वादातून थेट हाणामारी (Excise Officers Vs Dhaba Owner Fight) झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नंतर गैरसमजुतीतून ही मारामारी झाल्याची माहिती समोर आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी मुंबई पासिंगची इनोव्हा गाडी घेऊन परिसरात फिरत होते. त्यांनी एका हॉटेल चालकाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित धाबेवाल्याने त्यांना ओळखपत्र विचारल्याने वादाची ठिणगी पडली आणि प्रकरण हातघाईवर आलं.

Solapur Excise Officer Fight : ओळखपत्रावरून वाद, मारहाणीपर्यंत प्रकरण

धाबेवाल्याने अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली. मात्र यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी धाबेवाल्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.

Uplai Budruk Fight News : ग्रामस्थांचा संताप, अधिकाऱ्यांनाही चोप

या प्रकारानंतर घटनास्थळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी धाबेवाल्याला मारहाण केल्याचं पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच चोप दिला. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आणि दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Excise Officer Vs Dhaba Owner Fight : दोन्ही बाजूंचे जखमी रुग्णालयात

या घटनेत धाबेवाल्यासह उत्पादन शुल्क विभागाचे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने माढा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Madha Police Investigation : पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून नेमका प्रकार कसा घडला याची चौकशी केली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Embed widget