Barshi Crime: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये क्रूरतेचा कळस झाल्याचं दिसून आलंय. 15 वर्षांच्या मुलीशी जबरदस्तीनं लग्न करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह करत तिच्यावर अत्याचार केल्याने बार्शीत पतीसह आई वडील आणि सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मध्य प्रदेशमध्ये राहणारा हा आरोपी बार्शीत मजूरीचे काम करायचा.
आपली मुलगी 15 वर्ष अकरा महिन्यांची झाल्याचे समजताच मुलीच्या आई वडिलांनी मजूरीचे काम करणाऱ्या तरुणाशी आपल्या 15 वर्षीय मुलीचं जबरदस्तीनं लग्न लाऊन दिलं. या विवाहला मुलीने विरोध केला होता. मात्र त्यानंतर ही 27 एप्रिल 2024 रोजी बळजबरीने विवाह करण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील पतीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं मुलीला बार्शीत खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तपासात अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पतीसह सासू सासरे आणि मुलीच्या आई वडिलांसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. .
पोक्सोअंतर्गत पाच जणांवर गुन्हे
या घटनेनंतर महाराष्ट्र हादरला आहे. आपल्या 15 वर्षांच्या मुलीचं लग्न लावून देणाऱ्या आई वडिलांसह पीडित मुलीच्या पतीसह सासू सासऱ्यांवरही पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह करत अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली. पोट दुखू लागल्याने मुलीस बार्शीत एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तपासाअंतर्गत मुलगी गर्भवती राहिल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. मूळचा मध्यप्रदेश येथील असलेल्या आणि सध्या बार्शीत मजुरीचे काम करत असलेल्या एका तरुणाचा विवाह बार्शीतील एका अल्पवयीन मुलीशी करण्यात आला. मुलगी 15 वर्ष 11 महिन्यांची असल्याचे माहिती असताना देखील मुलीच्या आई वडील आणि मुलाच्या आई वडिलांनी हा विवाह केला. या विवाहला मुलीने विरोध केला होता. मात्र त्यानंतर ही 27 एप्रिल 2024 रोजी बळजबरीने विवाह करण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील पतीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पोटदुखीच्या त्रासामुळे तिला बार्शीत खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणीत अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पती, सासू-सासऱ्यासह आई वडील अशा एकूण पाच जणांच्या विरोधात पांगरी पोलिसात पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय.
हेही वाचा: