Solapur Barshi Froud Case Vishal Phate LIVE : मला लोकांचे पैसे बुडवायचे नाहीत. मी जेलमध्ये जरी गेलो तरी जेलमधून बाहेर आल्यावर मी लोकांचे पैसे देईन. मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन. एकाचाही एक नया पैसा देखील माझ्याकडून बुडणार नाही याची खात्री देतो. मी जाणूनबुझून केलेलं नाही, असं बार्शी फटे स्कॅमचा प्रमुख आरोपी विशाल फटे यानं म्हटलं आहे. एक व्हिडीओ जारी करत त्यानं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोबतच आज पोलिसात हजर होईल, असं देखील त्यानं सांगितलं आहे. 


विशाल फटे यानं म्हटलं आहे की, मी एका दिवसात 4 लाखाचे 54 लाख केलेला माणूस आहे. ते ही ट्रेडिंगमध्ये, लोकांना स्क्रिनसमोर उभं करुन केलेलं आहे. डॉक्टर, अधिकारी माझे क्लायंट आहेत. त्यांना सगळं माहित असतं. पण मला त्रास द्यायचा म्हणून हे सगळं केलं, असं त्यानं म्हटलं आहे. 


विशालनं म्हटलं आहे की, मला शोधायची गरज नाही, मी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होणार आहे. माझ्यावर जी कायदेशीर कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे. या गोष्टीमुळं मी इतका प्रेशर खाली आलोय की मी माझी बायको आणि लेकरासह आत्महत्या करायला चाललो होतो. एवढी इज्जत गेलीय. मला मरणं सोपं वाटत होतं. दीड वर्षाच्या मुलीसह मरायची तयारी होती माझी. या सगळ्या गोष्टीला मी एकटाच जबाबदार आहे. लोकांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनी वाट पाहा, ज्यांना विश्वास नसेल त्यांनी केसेस करा. मला पळून जायचं नव्हतं आणि जाणार नाही. 


मी कुठलाही कमिशन नेमलेला नव्हता. माझ्या चुकीमुळं ही गोष्ट झालीय, मी जे झालंय ते स्वीकारलं आहे. शिक्षा झालीय ती भोगायला मी तयार आहे. माझ्या घरच्यांनी माझ्या ऑफिसला कधीच भेटही दिली नाही. माझा बाप, आई साधी माणसं, मी एकटा सोडलो तर कुणाचाही यात सहभाग नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. मला पळूनच जायचं असतं तर मी आधीच तयारी केली असती. ब्लॅकनं व्हिजा काढला असता आणि दुबईला गेलो असतो. मी पळायचं असतं तरी आरामात पळालो असतो. आता सुद्धा मी कितीही दिवस लपून बसू शकतो, असं फटे यानं म्हटलं आहे. 


Barshi Scam : मोठी अपडेट; विशाल फटेचा व्हिडीओ समोर; म्हणाला, शिक्षा भोगायला तयार, आता सगळं माझ्या आवाक्याच्या बाहेर


विशाल फटे यानं म्हटलं आहे की, लोकांना मी व्यवसाय उभारुन दिले. मी कुणाला प्रलोभन दाखवलं नाही. हे प्रॅक्टिकली केलंय मी.  मी ट्रे़डिंगमधूनच हा पैसा उभा करत होतो. मी एकटा नाही असे अनेकजण आहेत. दिवसाला 40 ते 50 टक्के रिटन घेणारे लोकं आहेत. माझी चूक ही झाली की मी काहीतरी वेगळं करायला गेलो. 


विशालनं म्हटलंय की, माझ्या केलेल्या चांगल्या गोष्टी कुणाला माहिती नाहीत. माझ्या घरावरचे पत्रे काढून नेले. वायरिंग काढून नेल्या. माझ्यापेक्षा किती मोठे लोकं आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही झाली. 



विशाल फटे यानं म्हटलं आहे की,  मला लोकांचे पैसे बुडवायचे नाहीत. मी जेलमध्ये जरी गेलो तरी जेलमधून बाहेर आल्यावर मी लोकांचे पैसे देईन. मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन. एकाचाही एक नया पैसा देखील माझ्याकडून बुडणार नाही याची खात्री देतो. मी जाणूनबुझून केलेलं नाही. 


दिवसाला मी हजार लोकं माघारी पाठवायचो. मला घ्यायचं असतं तर कुणालाही माघारी पाठवलं नसतं. माझ्यासाठी जमीन गहाण ठेवली असा एकही माणूस नाही. उलट ज्याच्याकडं घरं नव्हती त्यांची घरं झाली, असं विशाल फटेनं म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha