Motorola New Phone : बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक मोबाईलपैकी मोटोरोला स्मार्टफोन हे एक नाव आहे. हा मोबाईल तरूणाईत तर प्रसिद्ध आहेच. पण कंपनी आता मोबाईलच्या एका नवीन मॉडेलवर काम करतेय. रिपोर्ट्सनुसार, अनेक महिन्यांपासून बाजारात चर्चा असणारा (Motorola Edge 30 Ultra) फ्लॅगशिप मोबाईल लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा नवीन मोबाईल अनेक गोष्टींसाठी खास असणार आहे. मोबाईलला फ्रन्टीयर (Motorola Frontier) कोडनेम दिला जाणार आहे. या मोबाईलचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा 200 मेगापिक्सल असणार आहे. या मोबाईलमध्ये आणखी कोणकोणते फीचर्स खास असणार आहेत, जाणून घ्या. 


रिपोर्ट्सनुसार, कंपनी फ्रन्टीयर कोडनेम/एज 30 अल्ट्रावर आतापर्यंत सगळ्याच कंपन्यांनी काम केले आहे. हा मोबाईल Motorola Edge X 30 चा अपडेटेड व्हर्जन असणार आहे. विशेष म्हणजे या मोबाईलमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो जो आतापर्यंत कोणत्याच स्मार्टफोनच्या सुविधेत उपलब्ध नाही.


या मोबाईलचे फीचर्स नेमके काय असतील ?
या मोबाईलमध्ये 6.674 इंचचा OLED कर्व्ड एज डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले फुल HD+ रेजॉल्यूशन बरोबर येईल. यामध्ये 144Hzचा रिफ्रेश रेट डिस्प्ले असेल. हे नवीन मॉडेल स्नॅपड्रॅगन (Snapdragon) 8 जेन 1 चीप वर चालेल. Motorola Edge X30 या मोबाईलच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. यामध्ये 20 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असणार आहे. तर 50 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असेल. तिसरा कॅमेरा हा 12 मेगापिक्सलचा असणार आहे. तसेच, तुम्हाला या मोबाईलमध्ये 60 मेगापिक्सेल OmniVision OV60A सेल्फी कॅमेरा देखील दिसेल. हा मोबाईल 2 व्हेरियंटसह बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिलं मॉडेल 8 जीबी रॅम+128 जीबी इंटर्नल स्टोरेजचे असेल. तर दुसरं मॉडेल 12 जीबी रॅम+256 जीबी इंटर्नल स्टोरेजचे असेल. 


फास्ट चार्जिंगचीदेखील सुविधा :
रिपोट्सनुसार, कॅमेऱ्या व्यतिरिक्त या मोबाईलचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. या मोबाईलचा 125wचा फास्ट चार्जर आहे. त्याचबरोबर तुम्हाला 50 w च्या वायरलेस चार्जिंगचे देखील ऑप्शन असणार आहे. 


या मोबाईलबरोबर होऊ शकते स्पर्धा :
सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या मोबाईलपैकी Vivo V23 Pro आणि  OnePlus 8T या मोबाईलचे कॅमेरे तरूणाईत प्रसिद्ध आहेत. त्यामुळे Motorola Edge 30 Ultra ची स्पर्धा या मोबाईलबरोबर होऊ शकते.


हे ही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha