एक्स्प्लोर

Wardha News : वर्ध्यात माणुसकीला काळीमा! सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार 

Wardha News Update : वर्ध्याच्या सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षीय चिमुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

Wardha News Update : माणुसकीला काळीमा फासणारी घटना वर्ध्यात घडली आहे. वर्ध्याच्या सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षीय चिमुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जिल्हाभर संताप व्यक्त केला जात आहे. घटनेतील आरोपी पीडित मुलीचा शेजारी असून नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या मुलासोबत खेळण्यासाठी गेली असता आरोपीने हे संताप जनक कृत्य केलं आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या 40 वर्षीय नाराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आणि आरोपीचे घर हे एकमेकांच्या शेजारी असून पीडित चिमुकली ही आरोपीच्या घरी त्याच्या मुलासोबत नेहमी खेळायला जायची. दरम्यान नेहमीप्रमाणे काल देखील ती आरोपीच्या घरी त्याच्या मुलासोबत खेळायला गेली होती. यावेळी 40 वर्षीय नराधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. या घटनेत चिमुकली प्रचंड घाबरली होती.  तिची आई आंघोळ घालण्यासाठी आरोपीच्या घरी तिला घ्यायला गेली असता तिला याबाबतची शंका आली.  पीडितेच्या आईला संशय आल्याने तिने मुलीला विचारपूस केली असता संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आईने आरोपीला याबाबत विचारणा केल्यानंतर  त्याने तिला शिवीगाळ केली. त्यामुळे पीडितेच्या आईने सावंगी मेघे पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात तक्रार दाखल केली. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे..

घटनेची माहिती मिळताच डीवाईएसपी पियुष जगताप, ठाणेदार धनाजी जळक यांनी  परिस्थितिचा आढावा घेत संबंधिताना निर्देश दिले. या प्रकरणात 40 वर्षीय आरोपी विरुद्ध विविध कलामांअतर्गत गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली.  पुढील तपास पीएसआय रुचिरा पात्रे, पीएसआय अनुराधा फकटकर करीत आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे. संशयितावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेली स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे.  

महत्वाच्या बातम्या

Crime: पत्नी गर्भवती असताना नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा; संतापलेल्या बायकोकडून मैत्रिणींच्या मदतीनं नवरा आणि त्याच्या प्रेयसीची हत्या 

आवाज देऊनही चालकानं गाडी थांबवली नाही, घाबरलेल्या 3 मुलींनी धावत्या जीपमधून मारली उडी

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget