एक्स्प्लोर

Sindhudurg Crime: कणकवली हादरली, दारुड्या मुलाने आईच्या डोक्यात कोयता घातला अन् सपासप वार

Sindhudurg Crime News: दारूच्या नशेत मुलाने 80 वर्षांच्या आईला संपवलं, कणकवलीतील वारगाव येथील घटना. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Sindhudurg Crime News: दारूच्या नशेमध्ये मुलानेच आपल्या आईचा खून केल्याची घटना कणकवली तालुक्यातील वारगाव, सोरफ-सुतारवाडी येथे रात्रीच्या सुमारास राहत्या घरी घडली. प्रभावती सोरफ या 80 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलगा रवींद्र सोरफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलिसांकडून गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे (Murder news) कणकवलीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच वृद्ध महिलेल्या मृत्युविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kankavli News)

संशयित आरोपी रवींद्र सोरफ याला दारूचे व्यसन आहे. सोरफ कुटुंबीय वारगांव सोरफ - सुतारवाडी येथील एका घरात रात्रीच्या सुमारास प्रभावती आणि मुलगा रवींद्र काही कारणावरून वाद झाला. त्यातून संतप्त झालेल्या रवींद्र याने थेट कोयत्याने (Koyta Attack) आईच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी वार केले. रवींद्र याने रक्तबंबाळ स्थितीतील आईला ओढत घराच्या हॉलमध्ये आणले. स्थानिकांनी याबाबत माहिती कणकवली पोलिसांना दिल्यानंतर पोलिस (Kankavli Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या डोक्यावर ठिकठिकाणी कोयत्याचे गंभीर वार होते. पोलिसांनी मुलगा रवींद्र याला ताब्यात घेऊन कणकवली पोलिस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रवींद्रने दारुच्या नशेत किंवा अन्य कोणत्या कारणामुळे आपल्या आईचा खून केला, याबाबतही अजूनही नेमके कारण आणि तपशील कळू शकलेला नाही.

Washim Crime: वाशिममध्ये रात्रीच्यावेळी वाहनाधरकांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

रात्रीच्या वेळी वाहन अडवून वाहनधारकांना एकटे असल्याचं  पाळत ठेवून  पैसे, मोबाईल, आणि दागिने (लूट करणाऱ्या)चोरणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यास वाशिम  स्थानिक  गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. याप्रकरणी  रमेश वाणी,अभिषेक वानखडे या दोन तरुणाला पोलिसांनी अटक केली असून ..या आरोपींनी किती गुन्हे केले आणि मुद्देमाल कुठं ठेवला किंवा विकला याबद्दल वाशिम पोलीस तपास करत आहेत. या तपासातून आता कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

नर्तकी पूजानं आता उघडलं तोंड, गोविंद बर्गे अन् तिच्या प्रेमाबाबत दिली कबुली, म्हणाली...

आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्यानंतर 'टपका रे टपका' गाणं कुठे लागलं होतं? लहान भावाने सगळं सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget