Shraddha Murder Case: देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडात (Shraddha Walker Murder Case) दररोज नवीन धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. श्रद्धाची हत्या करणारा आरोपी आफताब पुनावाला (Aftab Poonawalla) हा 15 दिवसांपूर्वी वसईत येऊन गेला असल्याची माहिती समोर आली आहे. आफताबचे कुटुंबीय हे वसईला राहत होते. मात्र, 15 दिवसांपूर्वी ते मीरा रोड येथे स्थायिक झाले आहेत. आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या सहा महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतरही त्याचा वावर सामान्य होता.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या श्रध्दा हत्याकांडाचा मुख्य आरोपी आफताब पूनावाला हा वसईच्या युनिक पार्क सोसायटीत राहत होता. त्याच्या कुटुंबातील सदस्य हे वसईतून 15 दिवसांपूर्वीच मीरा रोड येथे स्थायिक झाले आहेत. वसईतील सोसायटीचा हा फ्लॅट एक आठवड्यापूर्वीच भाड्याने देण्यात आला आहे. या घरात आफताबचे वडील, आई आणि लहान भाऊ राहत होते. अवघ्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या शिफ्टींगच्या वेळेस आफताब या वसईच्या घरात आला होता. त्यावेळी सोसायटीचे सचिव अब्दुला खान यांच्यासोबत त्याचे बोलणं झाले होते. या घटनेनंतर आफताबच्या कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होत नसल्याचे समोर आले आहे.
आफताबच्या कृत्याने मित्रांना धक्का
आरोपी आफताब पूनावाला यांचे संपूर्ण कुटुंब शांत आणि संयमी असल्याचे त्याचे मित्र आणि सोसायटीतील लोकांनी सांगितलं. आफताब याने दिल्लीत केलेले कृत्य समोर आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. आफताब असे घृणास्पद कृत्य करेल असे कोणालाही वाटले नव्हते.
आफताबचा मित्र निशांक मोदी याने सांगितले की आम्ही लहानपणीचे मित्र होतो. 15 वर्षांपूर्वी आम्ही त्याच्यासोबत खेळत असू. आज बातम्या पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. आपल्या बालपणीच्या मित्राने असे कृत्य केले याचा धक्का बसला. आफताबने सोसायटी खूप आधीच सोडली होती. मात्र, त्याचे कुटुंबीय इथे राहत होते अशीही माहिती मोदीने दिली.
हत्या केल्यानंतर आफताबकडून गुगल सर्च
आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केली होती आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली होती. आफताबने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने गुगलवर मानवी शरीर रचनेबाबत वाचून श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले होते. गुगल सर्च केल्यानंतर त्यांनी श्रद्धाच्या रक्ताचे डाग जमिनीवरून साफ केले. यासाठी आफताबने केमिकलचा वापर करून रक्ताने माखलेल्या कपड्यांची विल्हेवाट लावली. यानंतर त्यांनी श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला आणि जवळच्या दुकानातून फ्रीज विकत घेतला. नंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: