Shraddha Murder Case Updates: श्रद्धा हत्याकांडांबाबत (Shraddha Murder Case) दिल्ली पोलिसांनी  (Delhi Police)  तपासाची सूत्र वेगानं हलवण्यास सुरुवात केली आहे. आरोपी आफताबला जवळपास अडीच तास क्राईम सीनवर नेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांचं पथक मेहरौली (Mehrauli) येथील आरोपी आफताबच्या घरी पोहोचले आणि तपास केला. श्रद्धाचा मृतदेह तुकडे करुन ज्या फ्रिजमध्ये आफताबनं ठेवला होता, तोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांना फ्रिजसोबतच घरात नूडल्स आणि वॉटर हिटरही सापडले. वास येऊ नये म्हणून आफताब (Aftab) रूम फ्रेशनरसोबत अगरबत्तीचा वापर करायचा. त्याने सुमारे 22 दिवसांत बरेच रूम फ्रेशनर वापरले होते. पोलिसांना खोलीत थर्माकोलही सापडलं आहे. 


याशिवाय श्रद्धाच्या हत्येनंतर व्हॅक्यूम क्लिनरचाही वापर आफताबनं केला असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. तसेच, श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबनं घराबाहेर पडणं कमी केलं होत. तो जेवण किंवा इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीही घराबाहेर पडत नव्हता.  


दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या शरीराचे अवयव कापण्यासाठी फक्त एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला होता. शरीराचे अवयव कापण्यासाठी आफताबनं एका लहान करवतीचा वापर केला. पण आफताबनं वापरलेली ती करवत अद्याप पोलिसांना सापडलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वी आफताबला घेऊन दिल्लीतील जंगलात तपास केला होता. त्यावेळी जंगल्यातून सापडलेले तुकडे फॉरेन्सिक टीमनं जप्त केले आहेत. ते त्याच्या वडिलांच्या डीएनए नमुन्याशी जुळण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. तर इतर अवयवांचा शोध सुरु आहे. 


बम्बल अॅपकडून पोलिसांनी मागवली आफताबच्या प्रोफाईलची माहिती 


श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बम्बल अॅपकडून आफताबच्या प्रोफाईलची माहिती मागवली आहे. ज्यामुळे श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले असताना त्याला भेटण्यासाठी आलेल्या महिलांचा माहिती मिळू शकेल. यापैकी कोणी महिला श्रद्धाच्या हत्येत सहभागी तर ना? याची पडताळणी पोलीस करत आहेत. 


आधी प्रेम, मग हत्या; पण का? 


आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, "हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. अमेरिकन टेलिव्हिजन मालिका 'डेक्स्टर' मधून श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना सुचली. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी आरोपीनं 300 लिटरचा फ्रिज विकत घेतला. तसेच, घरातील मृतदेहाचा गंध लपवण्यासाठी तो अगरबत्ती आणि रुम फ्रेशनरचा वापर करत होता. मध्यरात्री दोन वाजता आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी घराबाहेर पडायचा आणि दिल्लीतील वेगवेगळ्या भागांत ते फेकून द्यायचा. हे करताना तो आवर्जुन एका गोष्टीकडे लक्ष द्यायचा की, कोणता तुकडा सडतोय, हे पाहुनच तो कोणता तुकडा फेकून द्यायचा हे ठरवायचा. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


फ्रिजमध्ये लिव्ह-इन पार्टनरचा मृतदेह आणि खोलीत दुसरी तरुणी, श्रद्धा हत्याकांडाची संपूर्ण कहाणी