एक्स्प्लोर

श्रद्धाला 2 वर्षांपूर्वीच लागलेली मृत्यूची कुणकुण? नोव्हेंबर 2020 मध्येच केलेली आफताबविरोधात तक्रार

Shraddha Murder Case: नोव्हेंबर 2020 मध्ये श्रद्धा वालकरनं आफताबविरोधात दिलेली पोलिसांत तक्रार. गळा दाबून जीवे मारण्याच्या धमकीचा उल्लेख, आफताबच्या कुटुबीयांना कल्पना असल्याचीही तक्रार.

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाची श्रद्धा वालकरला गेल्या दोन वर्षांपासून माहिती होती का? असा विचार करायला लावणारं एक पत्र समोर आलं आहे. यानुसार आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार श्रद्दानं 2020 मध्येच केली होती, अशी माहिती येत आहे. यात आफताब गळा दाबून मारण्याची आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचं या तक्रारीत नमूद आहे. तसंच आफताबच्या संपूर्ण कुटुंबालाही त्याच्या या वागण्याची माहिती होती, असंही श्रद्धानं या पत्रात लिहील्याचं समोर आलं आहे.  मात्र ही तक्रार दाखल केली, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आफताबला केवळ समज दिल्याची माहिती आहे.. श्रद्धानं काही काळानंतर ही तक्रार मागे घेतल्याचीही माहिती आहे.

श्रद्धा वालकरने लिहिलेलं पत्र गंभीर : देवेंद्र फडणवीस

2020ला श्रद्धा वालकर हिनं जिवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीसांना लिहीलं होतं. ते पत्र माझ्याकडे पण आलं आहे. हे अत्यंत गंभीर पत्र होतं. पण त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? याची माहिती नाही. त्याबद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही... मात्र, याची चौकशी व्हायला हवी. अशा प्रकारच्या पत्रावर कारवाई का होत नाही. त्या बद्दल कोणावरही दोषारोपण करू इच्छित नाही. मात्र, याची चौकशी व्हायला हवी. 

श्रद्धा वालकर हत्याप्रकरण, आरोपी आफताबचं इन्स्टा चॅट समोर

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबचं आणखी एक चॅट समोर आलं आहे. श्रद्धा आणि त्याच्या कॉमन मित्रासोबतचं हे इन्स्टाग्राम चॅट आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर चार महिन्यांनंतरचं हे चॅट आहे. मात्र या चॅटमध्ये श्रद्धाबाबत काहीच माहिती नसल्याचं आफताब या मित्राला भासवण्याचा प्रयत्न करतोय. आफताब आणि त्याच्या या मित्रामध्ये जवळपास 17 मिनिटं 33 सेकंद संभाषण होतं. या संपूर्ण संभाषणात श्रद्धा कुठे आहे? हे आपल्याला माहिती नाही असंच भासवण्याचा आफताब प्रयत्न करत असल्याचे उघड झालं आहे. मे महिन्यात आफताबनं श्रद्धाची हत्या केली होती. मात्र श्रद्धा आपल्याला सोडून गेल्याचं आफताब या मित्रांना भासवत होता. आफताब आणि श्रद्धाच्या या कॉमन मित्रानं हे चॅट आता पोलिसांना दिलं आहे. पोलिसांनी त्याचा जबाबही नोंदवला आहे. 

दरम्यान श्रद्धा वालकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ तिच्या महाविद्यालयीन जीवनातला आहे. या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थ्यांसोबत तिची नाटकाची तालीम सुरू आहे. रामायणातील सीताहरण या विषयावर श्रद्धानं अवघ्या 24 तासांत हे नाटक बसवलं होतं, अशी माहिती मिळतेय. यावेळी श्रद्धा बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shraddha Murder Case: दोन वर्षांपूर्वी आफताबविरोधात श्रद्धाने केली होती नालासोपारामध्ये पोलीस तक्रार, पण...

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  संशयास्पद व्यवहार आढळल्यास खातं गोठवलं जाणार, RBI चा मोठा निर्णय  
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी!  संशयास्पद व्यवहार आढळल्यास खातं गोठवलं जाणार, RBI चा मोठा निर्णय  
Crime : पत्नी आणि 3 चिमुकल्या लेकींनी संपवलं अन् थेट खाटूश्यामच्या दर्शनाला पोहोचला, अंगठी विकायचा प्रयत्न केला अन्...
पत्नी आणि 3 चिमुकल्या लेकींनी संपवलं अन् थेट खाटूश्यामच्या दर्शनाला पोहोचला, अंगठी विकायचा प्रयत्न केला अन्...
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या FDAची जळगावमध्ये मोठी कारवाई; लाखो रुपयांचा बनावट खवा, पेढे अन तूप जप्त, ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
तुकाराम मुंढेंच्या FDAची जळगावमध्ये मोठी कारवाई; लाखो रुपयांचा बनावट खवा, पेढे अन तूप जप्त, ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Embed widget