Shiv Sena UBT MLA Rajan Salvi : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची आज एसीबी (ACB) चौकशी होणार आहे. राजन साळवी (Rajan Salvi) हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) चौकशीच्या फेऱ्यात आहेत. जानेवारी 2024 मध्ये एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती.

Continues below advertisement


राजन साळवींची आज पुन्हा एसीबी चौकशी


अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजता आमदार राजन साळवी आपल्या कुटुंबीयांसह रत्नागिरी एसीबी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. हायकोर्टाला अंतरिम दिलासा देताना दिलेल्या निर्देशानुसार, आज साळवी कुटुंबीय चौकशीसाठी हजर राहतील. 


कुटुंबियांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


आज राजन साळवी यांचं कुटुंबीय दुपारी एक वाजता रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी हजेरी लावणार आहेत. मुंबई हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण हजर राहून चौकशीला सहकार्य करणार आहेत.


पत्नी आणि भावाची दोन दिवसापूर्वी एसीबी चौकशी


राजन साळवी यांची पत्नी आणि भावाची दोन दिवसापूर्वी एसीबी चौकशी झाली. आमदार राजन साळवी (Rajan Salvi's Wife) यांची पत्नी आणि भावाला 1 मार्चला एसीबीकडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली होती. एसीबीकडून राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला नोटीस बजावण्यात आली होती. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना रत्नागिरीच्या एससीबीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना या नोटीसीद्वारे देण्यात आल्या होत्या. 


राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला ACB ची नोटीस


अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आज आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांचा एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जबाब नोंदवण्यासाठी त्यांना आज एसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एसीबीकडून सकाळी 10 वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ACB कडून बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची किंमत फक्त 10 हजार, राजन साळवींची संतप्त प्रतिक्रिया!