एक्स्प्लोर

Ashok Kharat: साई संस्थानमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणानं जीवन संपवलं; सासरच्या मंडळींसह खरातचही नाव, चार वर्षांपूर्वीचा आरोप, आता खरातला मिळाला दिलासा, नेमकं प्रकरण काय?

Ashok Kharat: चार वर्षांपूर्वी भोंदू अशोक खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 2022 मध्ये विकास रामदास दिवटे नावाच्या तरुणाने आत्महत्या केली होती.

शिर्डी : कौटुंबिक वाद आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून शिर्डीतील ३७ वर्षीय तरुणाने चार वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मृताच्या सासऱ्यांसह मेहुणा आणि भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) यांच्यासह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासादरम्यान पुरावे अपुरे ठरल्याने खरातचे (Ashok Kharat)  नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विकास रामदास दिवटे (वय ३७, रा. शिर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, विकास दिवटे साईसंस्थानमध्ये कार्यरत होते आणि पत्नीशी घरगुती कारणांवरून त्यांचे वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. पत्नी व मुलाशी संपर्क साधण्यासही अडथळे निर्माण केले जात होते, तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे समोर आले होते.(Ashok Kharat) 

या वादात मीरगाव (ता. सिन्नर) येथील भोंदूबाबा अशोक खरात याचाही सहभाग असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला होता. विकास यांना या बाबाकडे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, त्यानेही त्यांना धमक्या देत त्रास दिल्याचा आरोप होता. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने विकास दिवटे यांनी ९ जून २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना सुसाइड नोटही सापडली होती. या प्रकरणात इतर तिघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, खरातचे नाव पुराव्याअभावी वगळण्यात आले असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.(Ashok Kharat) 

चार वर्षांपूर्वी भोंदू अशोक खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 2022 मध्ये विकास रामदास दिवटे नावाच्या तरुणाने आत्महत्या केली होती. मयत विकास दिवटे हा साईसंस्थांमध्ये नोकरीला होता, दिवटे याच्या सासरच्या मंडळींसह भोंदू अशोक खरातवर गुन्हा दाखल झाला होता. मयताचे भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पत्नीसोबत सुरू असलेल्या घरगुती वादात सासरच्या मंडळींसह अशोक खरात भावला मानसिक त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद केले होते. अशोक खरात याने विकास याला साईसंस्थानातील नोकरीवरून काढून टाकण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद होती. मानसिक त्रासाला कंटाळून विकास दिवटे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद भाऊ राजेंद्र दिवटे याने दाखल केली होती. मात्र पोलिस तपासात पुढे दोषारोप पत्रातून अशोक खरात याचे नाव वगळल्याची माहिती आहे. दिवटे आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरम्यान, राज्यभर चर्चेत असलेल्या खरात प्रकरणाच्या अनुषंगाने शिर्डीतील काही प्रतिष्ठित व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष तपास पथकाकडून संबंधितांना नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, शेतकरी फसवणूक प्रकरणात खरातच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. संबंधित व्यवहारांशी निगडित साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे कामही सुरू असून, पुढील तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget