एक्स्प्लोर

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात अशोक खरातचा हात? दीपक केसरकरांमुळे खरातच्या भावाला आयडी मिळाल्याचा आरोप, शिक्षण विभागाची मात्र चुप्पी

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या भावाला, दिलीप खरातला देण्यात आलेला आयडी हा खरा आहे की खोटा याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे या घोटाळ्यासंबंधी आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक : राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचा सहभाग असल्याचा संशय आता वर्तवण्यात येत आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून अशोक खरातचा भाऊ दिलीप खरातची चौकशी होण्याची शक्यता आहे. दिलीप खरातचा शालार्थ आयडी खरा की खोटा, याचा तपास पोलीस करणार आहेत. त्यामुळे शालार्थ आयडी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत धक्कादायक माहिती येणार समोर असल्याची शक्यता आहे.

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेला भोंदू अशोक खरात आता आणखी एका गंभीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याच्या भावाला मिळालेल्या आयडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 2022 साली तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या कार्यकाळात अशोक खरातने आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची चर्चा आहे. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस?

अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र त्याला मिळालेला शालार्थ आयडी खरा की खोटा, याबाबत आता संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा असून शिक्षण विभागातील काही फाईल्सही अशोक खरातच्या दबावाखाली मंजूर केल्याची चर्चा रंगली आहे.

Economic Offence Probe : आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी

नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिलीप खरात याची चौकशी होऊ शकते, तसेच या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच अशोक खरातशी संबंधित काही व्यक्तीही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे.

Political Link : राजकीय संबंधांवर चर्चा

अशोक खरात आणि दीपक केसरकर यांच्यातील संबंधांमुळेच त्याला शालार्थ आयडी मिळाल्याची चर्चा शिक्षण विभागात जोर धरत आहे. मात्र अधिकृतरित्या याबाबत कोणतंही स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

Rupali Chakanakar Case : रुपाली चाकणकर प्रकरणही गाजतंय

या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नावही समोर आलं होतं. त्यामुळे त्यांना आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसंच शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींसह त्यांनाही एसआयटीकडून समन्स बजावण्यात आलं असून चौकशी होणार आहे.

Nilesh Chakankar : रुपाली चाकणकरांच्या पतीवर आरोप

दरम्यान, रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात निलेश चाकणकरांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget